काय म्हणता ! सम-विषम समवेत आता कोरोनाला रोखणार पी-1, पी-2

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

शहरातील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता सम-विषम प्रणाली परत आणत मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पी-1, पी-2 व्यवस्था शनिवारपासून सुरू केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला ब्रेक लागण्याचे संकेत आहेत.

मूर्तिजापूर (जि. अकोला) : शहरातील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता सम-विषम प्रणाली परत आणत मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पी-1, पी-2 व्यवस्था शनिवारपासून सुरू केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला ब्रेक लागण्याचे संकेत आहेत.

क्लिक करा- लॉकडाऊनचे सुखद परिणाम, रिकाम्या हातांना दिला शेवटी शेतीनेच आधार!

असा आहे मुख्याधिकाऱ्यांचा आदेश
पी-1, पी-2 व्यवस्थेंतर्गत पालिकेच्या हद्दीतील दुकाने, मॉल्स व कॉम्प्लेक्सचे अनुक्रमे डावीकडील व उजवीकडील अशा दोन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. पी-1 रांगेतील दुकाने विषम तारखांना (3, 5, 7, 9..) आणि पी-2 रांगेतील दुकाने सम तारखांना (2, 4, 6, 8...) सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान खुली रहातील. सर्व दुकानांमध्ये सामाजिक अंतर राखणे व तोंडाला मास्क बांधणे अनिवार्य असेल. अंतर राखण्याकरिता टोकन पद्धती किंवा घरपोच सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल, थर्मल स्कॕनिग, हॅण्डवॉश किंवा सॕनिटायझरची सुविधा आवश्यक असेल.

पी-1 बंद असताना पी-2 समोर व पी-2 बंद असताना पी-1 समोर वाहने उभी करण्याची व्यवस्था आस्थापनाधारक-व्यापारी संस्थांना करावी लागेल कंन्टेनमेंट झोनसाठी मात्र, ही प्रणाली लागू नसेल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या दोन्ही रांगांमधील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकणारी आस्थापने, सिनेमागृहे, शॉपींग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, बार, प्रेक्षागृह, मंगल कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग, सलून, ब्युटी पार्लर, टी-स्टॉल बंद रहातील. दवाखाने, मेडिकल्स्, पेट्रोल पंप, कृषी केंद्र, बँक, दूध, कृउबास, स्वस्त धान्य दुकानांना हा आदेश लागू राहाणार नाही.

हेही वाचा- अरे व्वा...! बी-बियाणे, खते पुरवठ्यातून बेरोजगार हातांना काम!

कोणाचीही गय केली जाणार नाही
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. दुकाने सिल होतील, दंड वसूल होईल.
-विजय लोहकरे, मुख्याधिकारी, मूर्तिजापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola The beginning of the even-odd system