गाव करी ते राव न करी;  सामूहिक प्रयत्नांतून होतोय गावांचा कायापालट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावाने पाऊस आणि माती यांची सांगड घालून नवीन नवीन प्रयत्न करून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंदखेड ग्राम पंचायत ने सरकारी योजना चांगल्या रीतीने उपयोग केला आहे.

बुलडाणा : शासनाच्या  योजना  गावकऱ्यांचा सहभाग आणि काम करण्याची इच्छाशक्ती असली की हवे ते बदल घडविता येतात.  हेच सिंदखेडवासीयांनी दाखवून दिले आहे. सर्वांची योग्य सांगड घालत जलसंधारणाची केलेली कामे यामुळे या गावाचा कायापालट होण्याची वेळ आली आहे. सामूहिक प्रयत्नांतून गावाची पाणीपातळी वाढल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावाने पाऊस आणि माती यांची सांगड घालून नवीन नवीन प्रयत्न करून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंदखेड ग्राम पंचायत ने सरकारी योजना चांगल्या रीतीने उपयोग केला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शीवार योजना गावात मंजूर करून त्यात नऊ सिमेंट नाला बांध व खोलीकरण आणि जुने पांच  सिमेंट नाला बांध यांचे खोलीकरण तसेच पाझर तलाव खोलीकरण अशी कामे करण्यात आली. त्यातून तब्बल 200 टीसीएम पाणी साठा झाला. या कामा साठी  कृषी सचिव एकनाथरावां डवले यांनी सिंदखेड चे आभिनंदन केले आहे. गावकरी येथे न थांबता जलसंधारण वर कामें सुरूच ठेवले.


सिंदखेड ग्रामस्थांनी  सन 2018 मध्ये  वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन जलसंधाराचे कामे केली त्या कामां मध्ये सीसीटी, कंटुरबांध, शेततळे, माती नाला बांध, एलबीएस, गेबियान, कंपार्टमेंट बंडींग, माती नाला बांध,  खोलीकरण, वृक्षलागवड असे कामे केली .(एकी आणि नेकी च्या जोरावर राज्यस्तरीय द्वितीय परीतोषिक घेतले). या कामात सिंदखेड येथे अंशी हजार घण मीटर जल साठा झाला.त्या कामांचे फळ आता दिसू लागले. भूजल पातळी वाढली यावरून दिसून येत आहे.

Image may contain: plant, sky, tree, grass, outdoor, nature and water
खऱ्या अर्थाने विहिरीतील पाणी पातळी म्हणजे भूजलाच्या नाडी चे ठोके आहे
आज सिंदखेड पाणलोट क्षेत्रातील निरीक्षीण  केले . विहिरी मध्ये 2018/19/20 पातळी आभ्य्यास केला असता साधारणपणे 2 ते 3 मीटर पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. या मोजणी वरून सिंदखेड येथे भूजल साठा वाढत आहे असे दिसून येत आहे.

Image may contain: outdoor
राज्यात भूजल व्यवस्थापनाचे खूप चांगले प्रयत्न झालेले आहे. तसेच कायदे देखील झाले आहे. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी महसूल , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि कृषी विभाग कार्य करीत आहे. श्रमदान आणि मशीन काम करून गावाच्या भूजल पातळी वाढविली आहे. यात खूप आनंद मिळत आहे. हेच खरे यश, आणि हाच खरा विकास म्हटला जाईल. याचे पूर्ण श्रेय ग्रामस्थांना  जाते *
- विमल अर्जुन कदम सरपंच, जिल्हा स्मार्ट ग्राम, सिंदखेड

Image may contain: sky, outdoor, nature and water

शाश्वत विकासा डे वाटचाल
गावाने भौतिक विकास सोडून शाश्वत विकासा कडे वाटचाल केली आहे. नैसर्गिक साधनांचा उपयोग करून शाश्वत विकास शक्य आहे. जिवो जिवस्य जीवनम ही निसर्ग चक्र आहे. वृक्षा लागवड, वृक्षसंवर्धन, मृदा सवंर्धन, पाणी अडविणे, पाणी जिरवणे त्यातून शेतकरी  उत्पन्न वाढविणे तसेच जोडधंद्यातून विकास साधणे यावर गावाने भर देण्याचे ठरवले आहे. जल, जमीन आणि जंगल ही त्रिसूत्री चा वापर करून गाव स्वयंपूर्ण होऊ शकेल. सिंदखेड येथे सरकारी जमीन वर सरपंच विमल कदम यांनी पंचवीस हजार  स्वखर्च करून राहुरी येथून मंद्रस अंजन, पवना, माली कुसाडी गवत बी आणून सिंदखेड येथे लावले आहे. त्यांचे रोप करून पूर्ण परिसर हिरवा गार करून दूध उत्पन्न वाढविण्या साठी प्रयत्न केले जात आह. सदर गवत रोपांची निगा मा. उपसरपंच पती दिलीप मोरे, पद्मा अलोने हे घेत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola buldana Sindkhed ground water level increased due to water conservation works