Fertilizer : कृषी विभागामार्फत एक हजार ३७० मेट्रिक टन खतसाठा संरक्षित; युरिया व डीएपी खताचा समावेश

खरीप हंगाम २०२३ साठी केंद्र शासनाकडून १३.७३५ लाख मेट्रिक टन युरिया व ४.५० लाख मेट्रिक टन डीएपी खताचे आवंटन
1370 metric tons of fertilizer protected Department of Agriculture Urea and DAP fertilizer farmer akola
1370 metric tons of fertilizer protected Department of Agriculture Urea and DAP fertilizer farmer akolaesakal

अकोला : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात असतानाच खतांची संभाव्य टंंचाई निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खत उपलब्ध करुन देता यावे यासाठी या दोन्ही खतांचा साठा संरक्षित करण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरियाचा ६८० तर डीएपीचा ६९० मेट्रिक टन असा एकूण एक हजार ३७० मेट्रिक टन खतसाठा संरक्षित करण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२३ साठी केंद्र शासनाकडून १३.७३५ लाख मेट्रिक टन युरिया व ४.५० लाख मेट्रिक टन डीएपी खताचे आवंटन राज्यास देण्यात आले आहे.

1370 metric tons of fertilizer protected Department of Agriculture Urea and DAP fertilizer farmer akola
Akola News : जि.प.च्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या

परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांची निर्मिती व आवक आणि वाहतुकीची गंभीर अडचण निर्माण झाल्यास येत्या वर्षात खतांची टंंचाई निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खत उपलब्ध करुन देता यावे यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

त्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई व दि विदर्भा को-ऑपरेटिव्ह फेडरेशन लिमीटेड नागपूर आणि दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांना शासनाने नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.

1370 metric tons of fertilizer protected Department of Agriculture Urea and DAP fertilizer farmer akola
Akola Riots : अकोला दंगलप्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी अटकेत

या एजन्सी मार्फत युरीया व डीएपी खताचा संरक्षित साठा करुन ठेवण्यास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने राज्यभर युरिया व डीएपी खताचा साठा संरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ६८० मेट्रिक टन युरिया तर ६९० मेट्रिक टन डीएपी खतांचा साठा संरक्षित करण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश सुद्धा कृषी विभागाने दिले असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे.

टंंचाई भासल्यास होणार उपयोग

अवघ्या काही दिवसांवर खरीप हंगाम येवून ठेपला असून काही शेतकरी मान्सूनपूर्व पेरणी सुद्धा करतात. यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्याला यंदा ८५ हजार ४३० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले. खरीपात शेतकऱ्यांना रासायनिक खतांची टंचाई भासणार नाही यासाठी कृषी विभागाने खतांचे नियोजन केले आहे. शिवाय खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके सुद्धा नेमण्यात आले आहेत. त्यानंतर सुद्धा टंंचाई भासल्यास संरक्षित साठ्‍याचा उपयोग करता येईल.

1370 metric tons of fertilizer protected Department of Agriculture Urea and DAP fertilizer farmer akola
Akola News : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीची कारवाई; राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोप

गतवर्षीच्या तुलनेत डीएपीचा साठा कमी

खरीप हंगामात डीएपी खताला सर्वाधिक मागणी असे. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून शेतकरी या खताचा सर्वाधिक वापर करतात. गतवर्षी जिल्ह्याला १५ हजार २८९ मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला होता. यंदा मात्र त्याला कात्री लावण्यात आली असून १२ हजार ३० मेट्रिक टन खताला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा डीएपी खताची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे आहे मंजूर खतांचे आवंटन!

खतांचे नाव - मंजूर साठा (मेट्रिक टन)

  • यूरिया - २०९७०

  • डीएपी - १२०३०

  • एमओपी - ३०००

  • एसएसपी - २०६९०

  • संयुक्त खते - २८७४०

  • एकूण - ८५४३०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com