अकोला जिल्ह्यात वर्षभरात १८ लाख लोकांनी घेतली लस

लसीकरणाची वर्षपूर्ती; टप्प्या-टप्प्याने वाढली व्याप्ती
Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media
Summary

लसीकरणाची वर्षपूर्ती; टप्प्या-टप्प्याने वाढली व्याप्ती

अकोला : गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणू(corona update) धुमाकूळ घातल आहे. सदर विषाणूमुळे अनेकांचा मृत्यू झाला. त्यासोबतच अनेक रुग्ण बाधित झाले. विषाणू विरोधात सुरु असलेल्या या लढाईत लसीकरण मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली. मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात जिल्ह्यातील १७ लाख ९८ हजार ६९१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. त्यामध्ये फ्रंटलाईन व हेल्थलाईन वर्करसह(frontline and healthline workers) सामान्य नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान आता लसीकरणाची व्याप्ती वाढवत शासनाने बूस्टर डोससुद्धा(vaccine booster dose) देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा (omicron varient)कमी प्रभाव दिसून येत असल्याचा दावा आरोग्य विभागातील तज्ज्ञ करत आहेत.

Corona Vaccination
U19 World Cup : विकीचा 'पंजा'; धूल सेननं उडवला आफ्रिकेचा धुरळा!

देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्यात आले. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पोहचले. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. त्यानंतर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढली व आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १७ लाख ९८ हजार ६९१ नागरिकांनी कोरोनाची लस(covid vaccine) घेतली.

Corona Vaccination
किरण मानेंची मालिकेतून एक्झिट का? दिग्दर्शकाने सोडलं मौन

राज्यात ३०व्या, तर विभागात पाचव्या स्थानी

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे गत काही महिन्यांपूर्वी अकोला जिल्हा ३६व्या स्थानी पोहचला होता. त्यानंतर लसीकरणाची गती वाढवण्यात आल्यामुळे रॅंकमध्ये सुधारणा झाली होती. दरम्यान आता वर्षभरानंतर १५ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ३०व्या स्थानी आहे, तर विभागात सर्वात खालच्या स्थानी आहे. विभागात पहिल्या स्थानी अमरावती, दुसऱ्या स्थानी वाशीम, तिसऱ्या स्थानी बुलढाणा, चौथ्या स्थानी वाशीम जिल्हा आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात आले. त्यानुसार नागरिकांना कोव्हॅक्सीन व कोव्हिशील्डचे डोस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख नागरिकांनी पहिला, दुसरा व तिसरा डोस घेतला आहे.

- डॉ. मनीष शर्मा

जिल्हा लसीकरण अधिकारी, जि.प., अकोला

जिल्हा लसीकरण अधिकारी, जि.प., अकोला

जिल्ह्यात असे झाले लसीकरण (तीन डोस मिळून)

प्रकार उद्दीष्ट लसीकरण

  1. हेल्थ केअर वर्कर १३८६१ २७१९०

  2. फ्रंट लाईन वर्कर १४०६२ २८२२६

  3. १५ ते १७ वयोगट ९५०१५ ३३३३१

  4. १८ ते ४४ वयोगट ८८१८०० ९३५२९०

  5. ४५ ते ५९ वयोगट ३२३१०० ४३७४५२

  6. ६० वर्षावरील २२८१०० ३३७२०२

  7. अशी आहे लस घेणाऱ्यांची संख्या

Corona Vaccination
नांदेड : पक्षविरोधी कारवायामुळेच भिलवंडेंची हकालपट्टी

१५ ते ६० वर्ष वयोगटातील एकूण लाभार्थी संख्या - १५ लाख २८ हजार १५

  1.  पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या - ११ लाख ६० हजार ७१३

  2.  दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या - ६ लाख ३५ हजार ३७९

  3.  तिसरा डोस घेणाऱ्यांची संख्या - २ हजार ५९९

  4.  तिन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या - १७ लाख ९८ हजार ६९१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com