सुपर स्पेशालिटीमध्ये २५० खाटांचे कोविड रुग्णालय

वैद्यकीय शिक्षण मंत्री व वैद्यकीय शिक्षण संचालकांने निर्देश; अधिकारी लागले कामाला
सुपर स्पेशालिटीमध्ये २५० खाटांचे कोविड रुग्णालय

अकोला ः जिल्ह्यात कोरोना (corona) रुग्णांची वाढती संख्या बघता उपाचारासाठी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. सध्या जिल्ह्यात ४५० खाटांचे कोविड रुग्णालय Kovid Hospital शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात Government Medical College आहे. त्याला लागून आता सुपर स्पेशालिटीमध्ये २५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले जाणार आहे. त्यात ५० खाटा घ्या अतिदक्षता कक्षासाठी राहणार आहेत. 250 bedded covid hospital in super specialty

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत सुसज्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत उभी आहे. येथे आवश्यक साहित्यही आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची भरती न झाल्याने हॉस्पिटल रुग्ण सेवेत दाखल करता आले नाही. त्याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अधिकाऱ्यांनी ऑनलाइन सभा घेतली. त्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना दिला आहे. याकामी अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि अकोला जिल्हाधिकारी यांची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सध्या ४५० खाटांचे कोविड रुग्णालय आहे. यापैकी ६० खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने तातडीने २५० खाटांचे नवे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश देशमुख यांनी दिलेत. अकोला येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित असून, यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

या रुग्णालयासाठी आवश्यक असणारे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांची भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत आहे. हे कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत न थांबता याच इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियोजित कोविड रुग्णालयातील २५० खाटापैकी ५० खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील अशी माहिती देण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवर कर्मचारी नियुक्ती

कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच नर्सेस स्थानिक पातळीवर नेमण्यात यावेत आणि तातडीने या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात यावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

माणिकराव ठाकरे यांनी केली होती मागणी

अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गत आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. त्याची दखल तातडीने घेत देशमुख यांनी अधिकाऱ्यांना रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com