esakal | सायकलवरून पडून २७ वर्षीय युवकाचा मृत्यू,घात की अपघात!
sakal

बोलून बातमी शोधा

27-year-old youth dies after falling from Akola Marathi News Cycle

तालुक्यातील निंबोळी येथील २७ वर्षीय युवकाचा सायकलवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.

सायकलवरून पडून २७ वर्षीय युवकाचा मृत्यू,घात की अपघात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील निंबोळी येथील २७ वर्षीय युवकाचा सायकलवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.

ग्राम निंबोडी येथील विष्णू श्रीकृष्ण रावणचौरे वय २७ वर्ष राहणार निंबोडी हा युवक काल सायंकाळी आपल्या मजुरीचे पैसे घेण्यासाठी मनब्दा गेला असता काल सायंकाळी तो परत आला नाही.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

त्यामुळे  शोधाशोध घेतली असता मिळून न आल्याने वाट पाहली आज पहाटेच एका शेतकऱ्याला शेतरस्त्यावर मृत अवस्थेत सदर इसम दिसून आला.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या बाबत गावकऱ्यांना माहिती दिली  त्यानंतर जिल्हा पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके यांनी आपला ताफा घेऊन घटनास्थळ गाठले घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

मृतकाचा सायकलवरून पडून मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे .मात्र घटनास्थळ व सायकलची परिस्थिती बघता घात किंव्हा अपघात असल्याचे नागरिक बोलत आहेत नेमकी याबाबत तेल्हारा पोलीस कुठली भूमिका घेतात याकडे जनतेचं लक्ष लागले आहे.पुढील तपास ठाणेदार दिनेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली बिट जमादार जांभळे पो कॉ सागर मोरे करीत आहेत

(संपादन - विवेक मेतकर)

loading image