अकोला : २३ पीएसआय, ४२० पोलिस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

अकोला : २३ पीएसआय, ४२० पोलिस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त!

अकोला : पोलिस कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील पोलिस दलाचे(akola police department) काम प्रभावित होत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचीच जिल्ह्यात एकूण ४२० वर पदं रिक्त आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांची पदंही मोठ्याप्रमाणावर रिक्त असल्याने कामकाजांच्या दृष्टीने याबाबी अडचणीच्या ठरत आहे. भरती प्रक्रिया(Recruitment process) गेले अनेक वर्षांपासून राबविली गेली नसल्याने जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष वाढतच आहे.

हेही वाचा: अकोला ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अकोला पोलिस दलाच्या कामगिरीबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर(S.P. g. shridhar) आणि अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत माध्यमांसोबत रविवारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह पोलिस अधिकारी व सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधीक्षकांनी अकोला जिल्ह्यातील पोलिसांच्या रिक्त पदांमुळे कामकाज प्रभावित होत असल्याची कबुली दिली.

हेही वाचा: सिनेमागृहांवर निर्बंध; ५० टक्क्यांची मर्यादा

अनेक ठिकाणी गरज असतानाही पोलिसांचा बंदोबस्त ठेवता येत नाही. शहर वाहतूक शाखेसह सर्वच ठिकाणी मनुष्यबळ कमी असल्याने त्याचा थेट परिणाम कायदा व सुव्यवसथा राखताना, गुन्ह्यांचा तपास करताना होत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार झाला असल्याचे कळविले आहे. अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविली जात नसल्यामुले अकोला पोलिस दलातील ४२० पद रिक्त झाली आहेत याशिवाय पोलिस उपनिरीक्षकांचीही ७३ पंद मंजूर असताना जिल्ह्यात ५० अधिकारीच कार्यरत आहेत. आज घडीला २३ पंद रिक्त आहेत. यात विविध पोलिस स्टेशनचा प्रभारांसह सीआडी, विशेष पथकांची कामे प्रभावित होताना दिसत आहे.

हेही वाचा: अकोला : सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत १३ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात

वयोवृद्ध कर्मचाऱ्यांमुळे अडचणी

जिल्ह्यात एएसआय ते पीएसआय पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी २५ कर्मचाऱ्यांचे वय हे ५५ वर्षांपेक्षा अधिक आहे. ते काही वर्षांतच निवृत्त होणार आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी पदोन्नतीनंतर आजारी रजा घेतल्या आहेत. त्यामुळे पदं भरलेली असूनही, त्याचा प्रत्यक्ष कामकाजात उपयोग होत नसल्याची खंत पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola
loading image
go to top