अरे बापरे! चार महिन्यांत 31 लाखांचा गुटखा जप्त, अन्न वऔषध विभागाची कोविड काळातील कारवाई

भगवान वानखेडे
Thursday, 6 August 2020

अकोला शहर आणि जिल्ह्यात आयात होणाऱ्या गुटख्यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभागाने कोविड काळात धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत २७ प्रतिबंधात्मक कारवाया करून ३१ लाख २५ हजार ४९९ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

अकोला  ः अकोला शहर आणि जिल्ह्यात आयात होणाऱ्या गुटख्यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभागाने कोविड काळात धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत २७ प्रतिबंधात्मक कारवाया करून ३१ लाख २५ हजार ४९९ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे सांगितले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

असे असले तरी अकोल्यात सर्रास गुटखा मिळत असून कुठेही पिचकारी मारल्या जात आहे. यावर प्रतिबंध बसावा म्हणून एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान अन्न व औषध विभागाने २७ कारवाया केल्या असून, तब्बल ३१ लाख २५ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोविड काळात इतरही प्रशासकीय कामे आणि प्रतिबंधात्मक कारवायांचा ताळामेळ बसवून या चार महिन्यांत २७ कारवाया केल्या आहेत. पुढेही अशाच कारवाया सुरू राहणार आहेत.
-रावसाहेब वाकडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अकोला,
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 31 lakh gutka seized in Akola in four months, action taken by Food and Drug Administration during covid period