अकोला : सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत १३ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voting

अकोला : सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत १३ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात

अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक(election) कार्यक्रमाअंतर्गत रविवारी (ता. ८) मतदान(voting) होणार आहे. या निवडणुकीत १३ जागांसाठी ६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर २ हजार ७५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात एकूण ९ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकी दाेन मतदान केंद्र अकाेला व अकाेट येथे असून, अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येक एका केंद्रावर मतदान(voting booth) करता येणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे.

हेही वाचा: अकोला : दीड लाख नागरिकांचे दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष!

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी या संस्थेची स्थापना केली आहे. सध्या या संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार पतसंस्थेच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी विविध मतदारसंघातून ११३ शिक्षकांनी माघार घेतली. तर ६० शिक्षकांनी निवडणुकीत त्यांची दावेदारी कायम ठेवल्यामुळे त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्यानंतर जिल्हाभर शिक्षकांच्या पॅनलने प्रचार केला.

हेही वाचा: शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमचा हार

असे आहेत केंद्र व मतदार

अकाेला येथील बी. आर. हायस्कूल येथे दाेन मतदान केंद्र असून, या ठिकाणी प्रत्येक २९७ व २०७ मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अकाेट येथील जि.प. माध्यमिक शाळेत दाेन मतदान केंद्र असून, याठिकाणी ५३२ मतदारांसाठी मतदानाची व्यवस्था राहणार आहे. बार्शीटाकळी येथील जि.प. उर्दू प्राथमिक शाळेत (मुले) येथील केंद्रावर ३२७ मतदारांना मतदान करता येणार आहे. बाळापूर येथील न.प. प्राथमिक मराठी शाळेत (पेठ क्र. १) मतदान केंद्र असून, याठिकाणी ३४३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मूर्तिजापूर येथील शिवात्री नगरातील जि.प. माध्यमिक शाळेतील केंद्रात ३२९ मतदारांच्या मतदानाची व्यवस्था आहे. पातूर येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेत केंद्र असून, याठिकाणी ३२७ मतदारांना मतदान करता येणार आहे. तेल्हारा येथील इंदिरा नगरातील जि.प. प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात ४१४ मतदार मतदान करणार आहेत.

असे आहेत मतदार

तालुका मतदार ठेवीदार मतदार एकूण

  1. अकाेला ४१४ ८७ ५०१

  2. अकाेट ३९३ १२० ५१३

  3. बार्शीटाकळी २९१ ३६ ३२७

  4. पातूर २८० ४७ ३२७

  5. तेल्हारा ३२१ ९३ ४१४

  6. एकूण २३०३ ४५१ २७५४

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaelectionVoting
loading image
go to top