वाशिम जिल्ह्यातील ६४८९ शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ

वाशिम जिल्ह्यातील ६४८९ शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ

वाशीम ः पीक विमा काढलेला आहे परंतु, लाभ मिळाला नाही, अशा जिल्ह्यातील सहा हजार ४८९ शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून लाभ मिळणार आहे. खासदार भावना गवळींनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हे शक्य होत आहे. (6489 farmers in Washim district to get crop insurance)

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधार दिला जातो. परंतु, नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हक्काचे कोट्यवधी रुपये हडप करून स्वतःचे खीसे भरणाऱ्या वाशीम व यवतमाळ येथील रिलायन्स व इफको टोकीयो विमा कंपन्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी खासदार भावना गवळी यांनी दोन्ही जिल्ह्यात आंदोलने केले होती. २०२०-२१ ला नैसर्गिक अवकृपेमुळे सोयाबीन, कपाशी, तूर व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतर संकटात सापडलेले शेतकरी आनलाइन अर्ज करू शकले नव्हते व पीक विमा कंपन्याकडून सर्वेक्षण करणारे सर्वेक्षर कमी संख्येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण योग्य प्रकारे होत नव्हते.

कृषी विभागाने केलेले शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे सर्वेक्षण ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा या मागणीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे खासदार भावना गवळींच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भावना गवळी यांच्यासह शेतकरी नेते व शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले होते. परंतु, खासदार भावना गवळी यांनी राज्य शासनासह केंद्र शासनाकडे पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आवाज उठवत शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरिता पाठपुरावा सुरूच ठेवला होता.

त्यांच्या पाठपुराव्याला यश येवून केंद्रीय नैसर्गिक व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे केलेले सर्वेक्षण ग्राह्य धरून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबतच्या सूचना पीक विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आनलाइन अर्ज केले नव्हते परंतु, पीक विमा काढला होता तथा कृषी विभागाच्या सर्वेमधील यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाचे झालेल्या नुकसानाची पीक विमा रक्कम मिळण्याकरिता उशीरा अर्ज केले, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा हजार ४८९ शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून लाभ मिळणार आहे.

6489 farmers in Washim district to get crop insurance

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com