esakal | आप’ भरणार मुख्याधिकाऱ्यांच्या घरी पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

aap

‘आप’ भरणार मुख्याधिकाऱ्यांच्या घरी पाणी

sakal_logo
By
विवेक मेतकर

वाशीम : कोरोनाच्या महामारीने लोकांचे जगने कठीण झाले. प्रत्येकजन याच आशेवर जगत आहे की, उद्याचा दिवस चांगला येईल. अशा विपरीत परिस्थितीत स्थानिक नगरपरिषद मात्र, कुभंकर्णी झोपेत आहे.

शहराला तब्बल पंधरा दिवसा आड अशुद्ध पाण्याचा फक्त एक तास पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत ता.३० मार्च रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाच दिवसाआड पाणी पुरवठा करावा, पाणी पुरवठा होणार नसल्यास एक दिवसाआधी भोंगा फिरवून नागरिकांना सूचित करावे यासह अन्य मागण्याचे निवेदन देण्यात आले होते.

परंतु, जिल्हाधिकाऱ्यांना सामान्य लोकांचे देने-घेणे नसल्याने कुठलीच कार्यवाही न झाल्याने आम आदमी पार्टी, जिल्हाकडून मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या घरी पक्षांचे कार्यकर्ते, नागरिकांसह पाणी भरो आंदोलन करणार आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शंभर टक्के भरलेल्या धरणातील पाणी ऐन उन्हाळ्यात कुठे मुरत आहे ? असा सवाल आम आदमी पार्टीने केला आहे. निवेदन देते वेळी जिल्हा संगठनमंत्री राम पाटील डोरले, जिल्हा सचिव विनोद पट्टेबहादुर, शहर संयोजक तुळशीराम कांबळे यांची उपस्थिती होती.

संपादन - विवेक मेतकर