अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

कुरणखेड (जि. अकोला) - येथून जवळच असलेल्या एका गावावरून शाळेत शिक्षणाकरिता व शिकवणीकरिता येत असलेल्या एका अल्पवयीन १५ वार्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेतील दोन आरोपी फरार होण्याच्या तयारीत असतानाच त्यांना बोरगाव मंजू पोलिसांनी अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून ती ता. १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान शिकवणीला जात असतानाच आरोपी शेख मोईन शेख कय्युम (वय २१ रा. पैलपाडा) हा तिच्या जवळ आला व पीडितेला म्हणाला की, ‘तू माझ्या सोबत चल’, त्यावर पीडितेने त्याला नकार दिला असता, ‘तुझ्या लहान बहिणीला उचलून घेऊन जातो’ म्हणून आरोपीने पीडितेला बळजबरीने एका घरात घेऊन गेला. त्यावेळी त्यांचा सहकारी शोहब शहा सलाम शाह (वय २० रा.कुरणखेड) हा सुद्धा अरोपीसोबत उपस्थित होता.

शोहबच्या घरीच नेऊन आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. पीडितेने त्याला हे कृत्य करण्याचा विरोध केला असता, त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यात आरोपीच्या मोबाईलवर फोन आला आणि त्या संधीचा फायदा घेऊन पीडिता येथून पळण्यात यशस्वी झाली. घरी आल्यानंतर तिने आईजवळ घडलेली आपबिती सांगितल्यानंतर पीडिता तिच्या आईसह बोरगाव पोलिस स्टेशन गाठून आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.

पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध ३७६/२ ड, अ ५०६ भांदविसह कलम पास्कोसह ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला. पीडितेवर अकोला येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. घटनेतील आरोपी फरार होण्याच्या तयारीत असतानाच बोरगाव मंजू पोलिसांनी त्यांना अटक केली. ही कारवाई ठाणेदार सुनील सोळंके, योगेश काटकर, अब्दुल फय्युम, श्री.सपकाळ, दीपक कानडे यांनी केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय राऊत करत आहेत.

Web Title: Abusing A Minor Student Two Accused Arrested Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top