अकोला : रस्त्यासाठी युवकाची ‘धूळ फेक’

आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचा आरोप
Agitation against Public Works Department for fake assurance
Agitation against Public Works Department for fake assurancesakal

अकोला : शेगाव ते पंढरपूर या मार्गातील अकोला-निमकर्दा- पारस या टप्प्तातील कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फसवे आश्वासन मिळत असल्याचा आरोप करून उरळ येथेली गोपाल पोहरे या युवकाने मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागात धूळ फेक आंंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता हे आंदोलन केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सन २०१७ मध्ये ‘एचएम प्रोजेक्ट’ अंतर्गत अकोला-निमकर्दा-पारस या रस्त्याचे रुंदीकरणासह काम सुरू केले होते. त्याला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, रस्त्याचे काम अजूनही प्रगतीपथावरच आहे.

या कामाबाबत निवेदन देवूनही प्रत्येक वेळी संबंधित जबाबदार अधिकारी व विभागाणे लेखी व तोंडी फसवी आश्वासने दिल्याचा आरोपा गोपाल पोहरे यांनी करीत या विभागाविरुद्ध अधीक्षक अभियंता कार्यालयात धूळ फेकून आंदोलन केले. निमकर्दा आणि गायगाव आदी नागरी वसाहती सोडल्यास कुठेच पाणी मारल्या जात नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट रस्त्यावर उडत असल्याचा दावाही पोहरे यांनी केला.

अकोला-शेगाव रस्त्याचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे थांबले होते. मात्र, मी अकोला येथे रुजू झाल्यानंतर हे काम सुरू केले आहे. कंपनीने गेले दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात केली आहे. काही अडचणी असल्यास एक-दोन दिवसांसाठी काम बंद राहते. कोणी माहिती न घेता काहीही आरोप करीत आंदोलन करीत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो.

- दिनेश नंदनवार, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com