अकाेला : मुसळीच्या अनुदानासाठी शेतकरी प्रतीक्षेत

तीन वर्षापासून अनुदानच नाही; संबंधित विभाग उदासीन
Agriculture Department Farmer waiting for subsidy
Agriculture Department Farmer waiting for subsidysakal

बोर्डी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डीसह रामापूर, धारूर, लाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरागत शेतीसोबतच वनौषधीची शेती केली. शेतकऱ्यांनी ट्रक्टरच्या सहाय्याने शेत बेड पद्धतीने तयार करून त्यावर सफेदमुसळी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केली. सफेदमुसळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढती मागणी आहे. कृषीविभागाने या वनौषधीला सुरुवातीला हेक्टरी ६५ हजार रुपये अनुदान दिले, मात्र गत काही वार्षांपासून अनुदानासाठी शेतकऱ्यांची बोळवन होताना दिसात आहे.

या वनौषधी शेतीवर कुठलीही माहिती नसतांना तिचा शेतीचा अभ्यास करून शुन्यातला शेतकरी कुठपर्यंत मजल मारू शकतो हे अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायत्याशी असलेल्या बोर्डी येथील जगन्नाथजी धर्मे या शेतकऱ्यांनी करुन दाखविले आहे. १९८३ मध्ये औषधी वनस्पतीची प्रायोगिक लागवड व अभ्यासाला सुरवात करून १९९२ पासून त्यांनी सफेदमुसळीच्या व्यापारीतत्त्वाच्या लागवडीस सुरवात केली.

१९९४ मध्ये शेतकऱ्यासाठी औषधी वनस्पती व तेलेउत्पादक औद्धोगीक सहकारी संस्थेची स्थापना करून १९९७ मध्ये सफेदमुसळीची शेती व खुली वाहतूक आणि विक्री करण्याचा न्यायालयीन आदेश संघर्ष करून मिळवला. रानात असलेली वनौषधी आता संपूर्ण भारतात चार हजार एकरावर गेली. विद्धापीठातील संशोधकांनी केलेले सहकार्य व्यासपीठांनी व वृत्तपत्रांनी घेतलेली दखल महत्त्वपूर्ण आहे.

सफेदमुसळीला सध्या ७०० ते ९०० रुपये प्रतिकिलोचा भाव आहे. आधीच बाकी पिके तोट्यात असताना शेतकऱ्यांनी सफेदमुसळीची लागवन केली. जेणेकरून मुसळी पीक तरी झालेला तोटा भरून काढेल, मात्र या संबंधित सर्व यंत्रणा या पिकाचा आणि यावर मिळणारे अनुदानाला बगल देतात की काय? अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे.

वनऔषधी म्हणून मोठा वापर

आयुर्वेदीक औषधांमध्ये अग्रभागी असलेली बहुमोल, अशी वनऔषधी म्हणजे सफेदमुसळी. आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीचा पुरवठा अजूनही मोठ्या प्रमाणात जंगलातून बऱ्याच वनऔषधी जमा केल्या जातात, त्यातील सफेदमुसळीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी जंगलातून वनस्पती अक्षरशः ओरबडून काढत असल्याने त्या वनस्पती व जैवीकतेच्या संतुलनास बाधा पोहचत आहे. त्यामुळे काही प्रजाती नष्ठ होण्याच्या मार्गावर आहेत.

खजिना सांभाळण्याची जबाबदारी सर्वांची

जुने जानते वैद्य, आदिवासी औषधी वनस्पतीची काढणी विशीष्ठ काळातच करायचे, ज्यावेळी द्रव्यगुण भरपूर असतील, बिया पडलेल्या असतील, लहान रोपे सुप्तावस्थेत गेलेल्या असतील, अशा वेळी आवश्यक तेवढी काढणी करत, त्यामुळे जंगलाचा खजिना आजपर्यंत अबाधित होता. सफेद मुसळी, सप्तंरंगी, खंडूचक्का, सीता-अशोक, अशी वनस्पती आता दुर्मिळ होत चालली आहे. डोंगरवाटामधून मिळणारा हा निसर्गाचा ठेवा जर जपून ठेवायचा असेल, तर त्याचे संगोपन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

आम्ही दरवर्षी सफेद मुसळीची बेडपद्धतीने किंवा सरीने लागवड करतो. औषधी वनस्पती असल्याने चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे, मात्र काही वर्षांपासून उत्पन्नात येणारी घट आणि बाजार भावामुळे निराशा आहे. शासनाचे अनुदानही नियमीत मिळत नाही.

- प्रशांत धर्मे, शेतकरी, बोर्डी.

जिल्ह्याचा फलोत्पादन आढावा आणि औषधी वनस्पती आराखडा सादर केला आहे. परंतु, अजूनपर्यंत निधी मिळाला नाही. गत दोन वर्षांपासून वरीष्ठ स्तरावरून मागणी केल्या जात आहे. तालुक्यातील औषधी वनस्पती लागवडीकरिता अनुदानाचा लाभ देण्याविषयीचा आराखडा वरीष्ठ कार्यालयात नियमित सादर करण्यात आला. परंतु, दोनही वर्षाचा तालुक्यातील आर्थिक लक्षांक प्राप्त झाला नसल्याने शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लागवडीसाठी लाभ देता आला नाही.

- सुशांत शिंदे, तालुका कृषी अधिकारी, अकोट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com