अकोला : बियाणे महोत्सवात १२ कोटींची उलाढाल

तीन दिवसात ८५५४ क्विंटलचे बुकिंग तर, ४४११ क्विंटल बियाण्यांची विक्री
agriculture news 12 crore turnover in seed festival Bachchu Kadu akola
agriculture news 12 crore turnover in seed festival Bachchu Kadu akola sakal

अकोला : पालकमंत्री बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून व कृषी विभागाद्वारे १ ते ६ जून दरम्यान जिल्हाभरात आयोजित पहिल्या बियाणे महोत्सवाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, महोत्सवांतर्गत तीन दिवसात ८५५४ क्विंटल घरगुती बियाणाची बुकिंग व ४४११ क्विंटल बियाण्याची प्रत्यक्ष खरेदी झाली असून, यातून ११.८२ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अपेक्षित भाव बाजारपेठेत मिळत नसल्याने व उत्पादन खर्च प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत बिगडत असून, परिणामी दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येची संख्या फुगत चालली आहे.

त्यातही विविध कंपन्यांद्वारे अव्वाच्या सव्वा किमतीत विकले जाणारे बियाणे आणि या बियाण्याच्या उगवणक्षमतेवर निर्माण झालेला प्रश्‍न शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी झाली आहे. बियाणे कंपन्यांची मक्तेदारी तोडण्यासाठी व शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांकडे राहावा या उद्देशातून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चु कडू यांनी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या घरगुती बियाण्यांचा महोत्सव आयोजित करून ते बियाणे शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध ठेवण्याची संकल्पना तयार केली.

या संकल्पनेनुसार कृषी विभागाने १ ते ६ जून दरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बियाणे महोत्सवाचे आयोजन केले. विशेष म्हणजे या आयोजनाला शेतकऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बियाण्याला पसंती दर्शवित शुक्रवारपर्यंत ८५५४ क्विंटल बियाण्याची बुकिंग व ४४११.५० क्विंटल बियाण्याची प्रत्यक्ष खरेदी, अशी एकूण ११ कोटी ८२ लाख १६ हजार रुपयांची उलाढाल केली.

३ जूनपर्यंतची बियाणे विक्री व बुकिंग

तालुका बुकिंग (क्विं.) विक्री (क्विं.) रक्कम (लाख)

अकोला १९७८.५० ७८८.७५ १४८.१८

बार्शीटाकळी २४२६ १८०० ४५६

मूर्तिजापूर ९९० २८०.२५ ९६.६३

पातूर ८४० ५०० १६७

बाळापूर ७०२.५० १६२.५० ७२.५०

तेल्हारा ७२५.५० ६३२.२५ १५२.१८

अकोट ३७६३.५० २४७.७५ ८९.६७

एकूण ८५५४ ४४११.५० ११८२.१६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com