अकाेला SC साठी १५ तर ST साठी दोन जागा हाेतील आरक्षित!' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akala Municipal

अकाेला : SC साठी १५ तर ST साठी दोन जागा हाेतील आरक्षित!'

अकाेला: महापालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, साेमवारी (ता. २३) आरक्षण साेडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार अकाेल्यात ९१ जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन जागा आरक्षित हाेण्याची शक्यता आहे. उर्वरित ७४ जागा या खुल्या अर्थात सर्वसाधरणसाठी राहणार आहेत.

मनपा निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घ्यावी, असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला हाेता. प्रभाग रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या आदेशाने करण्यात आले हाेते. त्यानंतर मनपाने प्रभाग रचना आयोगाला सादर केली. आयोगाच्या सूचनेनुसार त्यावर हरकची व सूचना मागवून सुनावणीचीही प्रक्रिया पार पडली. प्रभाग रचनेचा अहवाल आधी निवडणूक आयोगाला व नंतर राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, अंतिम सुनावणीनंतरचा निकालच घाेषित झाला नाही. अशातच नवे विधेयक मंजूर झाल्याने ही रचनाही रद्द करण्यात आली हाेती. त्यानंतर अंतिम प्रभाग रचनेवरही शिक्कामाेर्तब झाला. आता आरक्षण साेडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे हाेते बलाबल

सन २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीतील पक्षनिहाय बलाबल

पक्ष सदस्य संख्या

१)भाजप ४८

२) काँग्रेस १३

३) शिवसेना ०८

४) राष्ट्रवादी काँग्रेस ०५

५) वंचित बहुजन आघाडी ०३

६)एमआयएम ०१

७) अपक्ष ०२

असा असेल कार्यक्रम

 शुक्रवार, ता. २७ मे ः जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे

 मंगळवार, ता. ३१ मे ः सोडत काढणे

 बुधवार, ता. १ जून ः प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे

 ता. १ ते ६ जून ः प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी

 सोमवार, ता. १३ जून ः प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणे

Web Title: Akala Municipal Elections Seats Reserved Sc Two St

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top