अकाेला : जि.प. पाेट निवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय

निवडणुकीत काँग्रेसचाही सफाया झाला
लिना शेगाेकार
लिना शेगाेकारsakal

अकाेला : जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या हातरुण सर्कलच्या निवडणुकीत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने दणदणीत विजय संपादन केला. वंचितच्या उमेदवार लिना शेगाेकार यांनी शिवसेनेच्या अश्विनी गवई यांचा १ हजार ६४१ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसचाही सफाया झाला. यानिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ति पक्ष हा महािवकास आघाडीचा प्रयाेग फसल्याचे दिसून आले. जुलै महिन्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाची निवडणूक हाेणार असून, पाेट निवडणुकीतील विजयामुळे सत्ता कायम ठेवण्याचा वंचितचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. साेमवारी निकाल जाहीर हाेताच वंचितच्या कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.

हातरूण सर्कलमधून शिवसेनेच्या सुनीता सुरेश गाेरे विजयी झाल्या हाेत्या. मात्र नामनिदर्शेनपत्र सादर करताना गाेरे यांनी शेत जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञालेखात केला नाही, असा आराेप विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला हाेता. आयुक्तांनी गाेरे यांना अपात्र घाेषित केले हाेते. त्यामुळे पाेट निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रविवारी मतदान झाल्यानंतर साेमवारी सकाळी बाळापूर येथे मतमाेजणीची प्रक्रिया पार पडली.

अशी मिळाली मते

पक्ष उमेदवार मिळालेली मते

वंचित लिना शेगाेकार ४३०१

शिवसेना अश्विनी गवई २६६०

भाजप राधिका पाटेकर २०९१

काँग्रेस रशिका इंगळे ३६२

अपक्ष अनिता भटकर ३९

शिवसेनेसह आ. देशमुख यांना धक्का

सन २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचे नितीन देशमुख विजयी झाले हाेते. त्यांनी गत दहा वर्षांपासून वंचितच्या ताब्यात असलेला मतदारसंघ काबीज केला हाेता. तेव्हापासूनच या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत वंचित विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताे. पाेट निवडणूकही आ. देशमुखसह शिवसेना आण वंचितने प्रतिष्ठेची केली हाेती. दाेन्ही बाजूने प्रचंड फिल्डींग लावण्यात आली. मात्र वंचितचा झालेला दणणीत विजय आण शिवसेनेचा दारूण पराभव हा देशमुख यांच्यासह शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच शिवसेनेची नवीन कार्यकारीणीत दाेन जिल्हा प्रमुख झाले. त्यातील एक जिल्हा प्रमुख म्हणून बाळापूर व मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी आ. देशमुख यांच्यावर साेपविण्यात आली हाेती.

त्यानंतर झालेल्या पाेट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव हा पक्षासाठी चिंतनाचा विषय ठरला आहे.सन २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचे नितीन देशमुख विजयी झाले हाेते. त्यांनी गत दहा वर्षांपासून वंचितच्या ताब्यात असलेला मतदारसंघ काबीज केला हाेता. तेव्हापासूनच या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत वंचित विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताे. पाेट निवडणूकही आ. देशमुखसह शिवसेना आण वंचितने प्रतिष्ठेची केली हाेती. दाेन्ही बाजूने प्रचंड फिल्डींग लावण्यात आली. मात्र वंचितचा झालेला दणणीत विजय आण शिवसेनेचा दारूण पराभव हा देशमुख यांच्यासह शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच शिवसेनेची नवीन कार्यकारीणीत दाेन जिल्हा प्रमुख झाले. त्यातील एक जिल्हा प्रमुख म्हणून बाळापूर व मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी आ. देशमुख यांच्यावर साेपविण्यात आली हाेती. त्यानंतर झालेल्या पाेट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव हा पक्षासाठी चिंतनाचा विषय ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com