esakal | अकोला: १२.६३ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य
sakal

बोलून बातमी शोधा

Akola: 12.63 lakh beneficiaries will get free foodgrains

अकोला: १२.६३ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव Outbreak of corona रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन Lockdown लागू करण्यात आला आहे. या काळात गरीब जनतेची गैरसोय टाळण्यासाठी राज्य व केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत मे महिन्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील व्यक्ती तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मे व जून महिन्यात मोफत धान्य वितरण Free grain distribution करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंत्योदय योजनेचे १ लाख ८८ हजार २२२ तर प्राधान्य योजनेच्या १० लाख ७५ हजार ५०२ लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल.

राज्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर रोजी गेली असली तर त्यांना रोटी मिळावी यासाठी गरीबांना शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत मे महिन्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील व्यक्ती तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मे व जून महिन्यात मोफत धान्य वितरण करण्यात येणार आहे. काही ठिकाणी त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील अंत्योदय योजनेच्या ४३ हजार ४७३ कार्डधारकांसह २ लाख ३६ हजार ७१६ प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल. अंत्योदय योजनेमध्ये १ लाख ८८ हजार २२२ तर प्राधान्य योजनेमध्ये १० लाख ७५ हजार ५०२ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मोफत धान्याचा फायदा सदर लाभार्थ्यांना होईल.

हेही वाचा: न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

असा मिळणार लाभ

- प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ प्रती व्यक्ती मोफत.

- अंत्योदय गटाताली लाभार्थ्यांना १५ किलो गहू तर २० किलो तांदुळ प्रती कार्ड मोफत.

- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी प्रती सदस्य प्रतिमाह ३ किलो गहू व २ किलो तांदुळ मोफत.

- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय गटातील लाभार्थ्यांसाठी प्रती सदस्य प्रतिमाह ३ किलो गहू व २ किलो तांदुळ.

- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुंटुबातील लाभार्थ्यांसाठी तुरदाळ, चणादाळ प्रथम या तत्वानुसार देण्यात येईल. त्याचा लाभ प्राधान्याने अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल, त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याना वाटप करण्यात येईल.

हेही वाचा: सुलतानपुर येथील भारतीय सैनिकाचा कर्तव्यावर असताना राजस्थान येथे मुत्यू

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत मे महिन्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील व्यक्ती तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मे व जून महिन्यात मोफत धान्य वितरण सुरु झाले आहे. लाभार्थ्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन धान्याची उचल करावी.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

संपादन - विवेक मेतकर

loading image