esakal | २२४ गुन्हेगार तडीपार; तरीही गुन्ह्यांची मालिका सुरूच!
sakal

बोलून बातमी शोधा

 crime

Akola : २२४ गुन्हेगार तडीपार; तरीही गुन्ह्यांची मालिका सुरूच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता रहावी याकरिता अकोला जिल्ह्यातील आणखी एक गुन्हेगारी टोळी दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत २२४ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. घरफोडी, चोरी, लुटमारी सारख्या घटनांनी जिल्ह्यातील नागरिक भयभीत आहेत.

अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता रहावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांकडून कायदा व सुव्यवस्थेस तडा जावून जिल्ह्याची शांतता भंग होणार नाही याकरिता अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे तसेच कारवाईस न जुमाननाऱ्या लोकांविरुध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे. त्याअनुषंगाने खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार विक्की राहुल पावनमारे (२४), प्रेम राहुल पावनमारे (२६), जय संजय पावनमारे (२८) सर्व रा. गौतम नगर याचेवरील गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांचे विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवार, ता. ९ ऑक्टोबर रोजी दिला.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपावेतो एकूण ३९ ईसमांविरुध्द एमपीडीए ॲक्ट अन्वये कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये एकूण ७८ गुन्हेगारी टोळ्यांतील एकूण १९० इसमांना तसेच कलम ५६ महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये ३४ इसम असे एकूण २२४ इसमांना आजपर्यंत अकोला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून या कारवाई करण्यात येत असल्या तरी त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये घट झालेली नाही. अकोला शहरातच चोरी, लुटमाऱ्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहे. गुन्हेगारांकडून घात शस्त्र बाळगून लोकांना धमकावत खंडणी उकळण्याचे प्रकारही सुरू आहे. त्यामुळे तडीपारीच्या कारवाईचे आदेश निघत असले तरी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मात्र, यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.

loading image
go to top