अकाेला : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा २४५ क्विंटल तांदूळ जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २३ लाख रुपयांच्या मुद्देमालासह ट्रक जप्त
Akola 245 quintals black market rice and Truck seized
Akola 245 quintals black market rice and Truck seized sakal

बाळापूर : काळाबाजारात जाणारा शासकीय रेशनचा २४५ क्विंटल तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या शिधापत्रिकेवर वितरित होणाऱ्या तांदळाची काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करणारा ट्रक बुलडाणा येथून खामगाव-बाळापूर मार्गे गोंदिया येथे जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, दत्ता ढोरे, विशाल मोरे, संदीप ताले, रवी पालिवाल, श्रीकांत पातोंड, विजय कांबळे हे गुन्हे शाखेचे पथक राष्ट्रीय महामार्गावरील कलकत्ता ढाब्या जवळ तपासणीसाठी थांबले.

मंगळवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास तांदुळाने भरलेला ट्रक येताना दिसून आला. यावेळी पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात पाच लाख ३६ हजार ८०० रुपये किमतीचा रेशनिंगचा तांदूळ असल्याचे आढळून आले. यासंदर्भात ट्रक चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली. त्याची कसून चौकशी केली असता, हा तांदूळ बुलडाणा येथून गोंदिया येथे जात असल्याचे त्याने सांगीतले.

यासंदर्भात पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन बाळापूर पोलिसात जमा केला. ट्रकचालक राजाराम रघुबिर पाल (वय ५२ रा.नागपूर) व सरसपाल रामानंद पाल (वय ५४ रा.प्रतापगढ उत्तर प्रदेश) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील १८ लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रक, दोन मोबाईल किंमत दहा हजार ५०० रुपये, असा एकूण २३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com