Akola Agar main pipeline Leakage
Akola Agar main pipeline Leakagesakal

अकाेला : आगर येथे तीन आठवड्यापासून पाणीपुरवठा बंद

ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती; मुख्य जलवाहिनीला गळती

आगर : मृग नक्षत्राला प्रारंभ होवून आठवडा उलटला, तरी अद्याप प्रयत्नपर्यंत वरूण राजाने थोडीफार कृपा करून शेतकऱ्यांसह शेतमजुरांना आनंदीत केले असले, तरी आगर येथे खांबोरा नळ योजनेचे येणारे पाणी गत तीन आठवड्यापासून बंद असल्याने पावसाळ्याच्या दिवसातही येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

आता खरिपाचा हंगाम चालू झाला आहे. शेतकरी, शेतमजूर आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत. परंतु, पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मजुरांना काम सोडून आधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. खांबोरा नळ योजनेतील शेवटची गाव म्हणून आगर, नवथळ, खेकडी, परितवाडा, कंचनपूर, पाळोदी, गोत्रा ही गावे समाविष्ट आहेत. या गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो.

गत दहा दिवसा अगोदर उगवा गावापर्यंत पाणी पोहोचताच चार-पाच दिवस झाल्यावर पूर्णतः पाणीपुरवठा बंद पडला. याबाबत चौकशी केली असता, मुख्य पाईप लाईन जोडणीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद पडला असल्याची माहिती आहे. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या पाण्याच्या अडचणी विचारात घेऊन वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन पाणी पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी आगरसह परिसरातील ग्रामस्थांकडून केल्या जात आहे.

उगवा येथे पाणीपुरवठा सुरू असतांनाच मुख्य पाईप लाईनला गळती लागली होती. त्यामुळे आगरसह परिसरातील गावांतील पाणीपुरवठा बंद पडला होता. लवकरच पाईपचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

- अनिल चव्हाण, अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जि.प.अकोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com