अकोला : खते, बियाणे लिंकिंगवर कृषी विभागाचे लक्ष! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Agriculture department attention to fertilizer and seed sellers

अकोला : खते, बियाणे लिंकिंगवर कृषी विभागाचे लक्ष!

अकोला : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. त्यातच यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे खेत, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची एकच झुंबड उडणार आहे. ते बघता विक्रेत्यांकडून होणाऱ्या लिंकिंगवर कृषी विभागाचे बारीक लक्ष राहणार आहे. यासंदर्भात जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्या कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना समज दिला.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोला यांच्यावतीने कृषी व्यवसायिक संघ अकोला यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, गुणनियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे तसेच तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी कु. रोहिणी मोघाड, जिल्हा अध्यक्ष कृषी व्यवसायिक संघ मोहन सोनवणे उपस्थित होते.

बोगस बीटी बियाणे व एचटीबीटी बियाणे तालुक्यांमध्ये विकले जाऊ नये याची खबरदारी विक्रेत्यांनी घ्यावी. सोयाबीन बियाण्याची विक्री करताना गतवर्षी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी बियाणे विक्रीपूर्वी उगवणक्षमता तपासूनच विक्री करण्यात यावी. बियाणे व खते विक्री करताना कोणतीही लिंक करून बियाणे,खते विकू नये. जादा दराने खते व बियाणे विक्री करू नये. शेतकऱ्यांना बियाणे व खते योग्य दराने व योग्य पद्धतीने मिळतील याचे नियोजन करण्यात यावे. कृषी सेवा केंद्रधारकांनी सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवावे. कायद्यानुसार सर्व बाबींची पूर्तता करावी, अन्यथा अप्रिय कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही या कार्यशाळेतून विक्रेत्यांना देण्यात आला.

प्रास्ताविक व संचालन तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांनी केले. आभार गणेश परळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता कु. मनीषा जोशी, कु. मीना चव्हाण, कृषी अधिकारी गजानन महल्ले, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, व्ही. एच. राखुंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Akola Agriculture Department Attention To Fertilizer And Seed Sellers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top