अकाेला : ‘श्रीं’ च्या पालखी मार्गाची दुरवस्था कायमच

प्रशासनाचा दुर्लक्षितपणा की, लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता?
Akola balapur Shree gajanan maharaj palkhi route bad road condition
Akola balapur Shree gajanan maharaj palkhi route bad road conditionsakal

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील पालखी मार्गाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात असल्याने या संदर्भात प्रशासनाचा दुर्लक्षितपणा जबाबदार आहे की, लोकप्रतिनिधी यांची अकार्यक्षमतेचा परिचय आहे?, असा गंभीर प्रश्‍न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

बाळापूर तालुक्यातील पारस, निमकर्दा, गायगाव मार्गे अकोला जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था असून, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी संबंधित नागरिकांकडून वेळोवेळी शासन दरबारी, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मार्गाच्या वस्तुस्थितीसह निदर्शनास आणून दिले आहे. या मार्गाच्या दुरुस्ती संदर्भात गत काही वर्षांपासून अतिशय कासव गतीने काम सुरू असल्याचे पाहवयास मिळत आहे. याच मार्गावरून विदर्भाची पंढरी म्हणून परिचित असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला मार्गस्थ होत असते. मार्गाच्या दुरावस्थामुळे पालखी सोहळ्यातील वारकरी मंडळी, वाहनांचा ताफा यांना मार्गावरून जात असताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले.

दैनंदिन शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची मोठी वर्दळ असते. परंतु, मार्गाच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निवेदने आंदोलन करून सुद्धा या मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक, वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाने या पालखी मार्गाच्या दुरावस्थाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून मार्गाची योग्य प्रकारे दुरुस्तीसाठी प्रयत्न करून प्रवासी, तसेच भाविकांना होत असलेल्या असुविधा सोडवणे आवश्यक आहे.

- चंद्रशेखर चिंचोळकर, जि.प.सदस्य, अकोला.

गत दोन वर्षात पालखी सोहळा बंद होता, त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती असलेल्या मार्गाची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. परंतु, मार्गाची अपूर्ण दुरुस्ती का रखडली? हा प्रश्‍न अनुत्तिर्णच आहे. मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या मार्गाची पूर्ण दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

- शारदा बोरचाटे, ग्रा.पं.सदस्या, कवठा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com