अकोला : गॅस सिलिंडरचा काळाबाजार; दोन आरोपींना अटक

१६ घरगुती गैस सिलिंडरसह ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
Gas Cylinder
Gas CylinderSakal

अकोला : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तालुक्यातील पळसोबढे गावात छापा मारून सिलिंडरची काळाबाजारी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून १६ घरगुती गैस सिलिंडरसह ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनातील विशेष पथकास शनिवारी माहिती मिळाली की पळसो बढे गावात पीएचसी समोरील पानटपरीवर अवैधरित्या घरगुती गॅस सिलिंडर बाळगून त्याची जास्त दराने विक्री केली जात आहे.

संबंधित व्यक्तीजवळ त्यासाठीचे लायसेन्स नाही. त्यावरून पीएचसी समोरील अमोल लांडे यांच्या पानटपरीमध्ये तीन घरगुती गॅस सिलिंडर तसेच भास्कर रामचंद्र फरकुंडे याच्या घरात १३ घरगुती गॅस सिलिंडर विनापरवाना मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ६० हजार रुपये किंमतीचे १६ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींच्या विरोधात बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com