esakal | बोगस बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांवर ‘कोर्ट केस’ दाखल, सहा बड्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे अप्रमाणित प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola bogus seed case: Court case filed against two companies, soybean seed uncertified case of six big companies

वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी सोयाबीनचे बोगस बियाणे मारणाऱ्या दोन कंपन्यांविरोधात मूर्तिजापूर न्यायालयात शुक्रवारी (ता. ३१) कोर्ट केस दाखल करण्यात आली. त्यामध्ये मे. सारस ॲग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अग्रो सर्विसेस या दोन कंपन्याचा सहभाग आहे. सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेत फेल (अप्रमाणित) आल्यामुळे संबंधित कंपन्यांविरोधात सदर कारवाई करण्यात आली.

बोगस बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांवर ‘कोर्ट केस’ दाखल, सहा बड्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे अप्रमाणित प्रकरण

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला  ः वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी सोयाबीनचे बोगस बियाणे मारणाऱ्या दोन कंपन्यांविरोधात मूर्तिजापूर न्यायालयात शुक्रवारी (ता. ३१) कोर्ट केस दाखल करण्यात आली. त्यामध्ये मे. सारस ॲग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अग्रो सर्विसेस या दोन कंपन्याचा सहभाग आहे. सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेत फेल (अप्रमाणित) आल्यामुळे संबंधित कंपन्यांविरोधात सदर कारवाई करण्यात आली.

यावर्षी खरीप हंगात शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने सोयाबीचे बियाणे पेरले. पेरण्या आटोपल्यानंतर पाऊस सुद्धा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्यामुळे शेतकरी बोगस बियाण्यांच्या दुष्टचक्रात सापडले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे शेकडो एकरवरील पेरण्या सुद्धा उलटल्या. दरम्यान हा सर्व प्रकार झाल्यानंतर जुलैमहिन्यात महाबीजसह सहा बड्या कंपन्यांचे बियाणे उगवण क्षमतेत अप्रमाणित निघाल्याचा ठपका बियाणे गुणवत्ता परिक्षण प्रयोगशाळांनी ठेवला. त्यामुळे संबंधित सहा बियाणे कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत नोटीस जारी करण्यात आली. त्यापैकी दोन कंपन्यांनी दिलेले खुलासे योग्य नसल्यामुळे कृषी विभागाने संबंधित मे. सारस ॲग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अग्रो सर्विसेस विरुद्ध मूर्तिजापूर न्यायालयात खटला दाखल केला. मूर्तिजापूर येथून सदर कंपन्यांचे बियाणे नमूने घेण्यात आले होते. त्यामुळे सदर प्रक्रिया मूर्तिजापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तिजारे यांनी पार पाडली.
 
इतर कंपन्यासुद्धा ‘रडार’वर
अप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांविरोधात कोर्ट केस दाखल करण्यात आली आहे. परंतु
वरदान बायोटेक, बुस्टर प्लॅन्ट जेनेटीक, महाबीज, केडीएम सिड्‌स इत्यादी कंपन्यांचे सोयाबीनचे जेएस ३३५ चे वाण सुद्धा प्रयोगशाळेत अप्रमाणित आढल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
सोयाबीन बियाणे अप्रमाणित प्रकरणी दोन कंपन्यांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. इतर कंपन्यांविरोधात सुद्धा लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- मुरलीधर इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)