झोपडीतील बहिणीसाठी मनसेचे पदाधिकारी झाले भाऊ!, दहावीत ९४ टक्के गुण विळविणाऱ्या श्रद्धाच्या शिक्षणासाठी दरमहिना हजार रुपये देणार

मनोज भिवगडे
Monday, 3 August 2020

झोपडीवजा घर...वडिल अर्थाजणासाठी मूर्ती तयार करून विकतात...वडिलांच्या कामात मदत केल्याशिवाय घरात दोन वेळच्या जेवणाचीही सोय होणार नाही अशी परिस्थिती...याही परिस्थितीत श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा, अकोलाची विद्यार्थिनी श्रद्धा रमेश गातेने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

अकोला  ः झोपडीवजा घर...वडिल अर्थाजणासाठी मूर्ती तयार करून विकतात...वडिलांच्या कामात मदत केल्याशिवाय घरात दोन वेळच्या जेवणाचीही सोय होणार नाही अशी परिस्थिती...

याही परिस्थितीत श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा, अकोलाची विद्यार्थिनी श्रद्धा रमेश गातेने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तिची ही गुणवत्ता परिस्थितीमुळे वाया जाऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्षबंधनाच्या पर्वावर भाऊ बनवून पुढे येत पुढील शिक्षणाकरिता तिला दरमहा एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला शहरातील अकोट फैल भागातील अशोक नगरात श्रद्धाचे कुटुंब राहते. श्रद्धाचे आई-वडील पारंपरिक कुंभार व्यवसायात. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावरच चालतो. आर्थिक परिस्थिती हलाखीची. त्यामुळे आई-वडिलांसोबत श्रद्धा मातीचे माठ, गणपती, देवीची मूर्ती तसेच गाडगे व पणत्या तयार करण्याचे काम करते. कुंभार काम करून इयत्ता दहावी परीक्षेमध्ये तिने यशाची भरारी घेतली आहे.

Image may contain: 2 people

तिला पुढे आयएएस व्हायचे आहे. तिची गुणवत्ता आर्थिक परिस्थितीपुढे दबून जाऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मनसेविच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धा गाते हिच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जवाबदारी उचलली.

 तिला आर्थिक सहाय्य करण्यात आले. यापुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अकोला जिल्हातर्फे करण्यात येणार आहे. एक हजार रुपये महिना शिक्षण पूर्ण होईपर्यंत महिन्याच्या प्रत्येक १ तारखेस तिच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आर्थिक मदतीचा पहिला धनादेश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या हस्ते श्रध्दाला देण्यात आला. अशा होतकरू विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यास शिक्षण विभाग कटिबध्द असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसंगी आदित्य दामले, रामाभाऊ ऊंबरकार, ललित यावलकर, रणजीत राठोड, सतीश फाले, राकेश शर्मा, सौरभ भगत, विकास मोळके, आकाश गवळी, सूरज पातोंड आदी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Brother becomes MNS office bearer for his sister in a hut! He will pay Rs