Breaking : कोरोनाचा विस्फोट; एकाच रात्रीत अवघे गाव झाले हॉटस्पॉट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

कोरोना प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असताना जिल्हा प्रशासन एकीकडे वेगवान हालचाली करत कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना करत असताना दुसरीकडे कनिष्ठ यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा प्रत्यय येत आहे.

बुलडाणा : कोरोना प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असताना जिल्हा प्रशासन एकीकडे वेगवान हालचाली करत कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजना करत असताना दुसरीकडे कनिष्ठ यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा प्रत्यय येत आहे.

जळगाव जामोद शहरासह तालुक्यात बोटावर मोजण्याइतके रुग्ण असताना तेथील प्रशासनाने वेळीच खबरदारी न घेतल्यामुळे दहा, वीसचा आकडा तब्बल 141 वर पोचला असून, तोही एक दिवसात. उशिरा का होईना आता जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक अधिकार्‍याांसोबत बैठक घेतल्यानंतर प्रशासनाने जलदगतीने कारवाई सुरू केली आहे. 

जळगाव जामोद तालुक्यातील दीड ते 2 हजार लोकवस्ती असलेले गाव. गावात एक धार्मिक कार्यक्रमाचे एका भागात आयोजन होते आणि त्यातूनही कोरोना प्रादुर्भावचा स्फोट होतो. दहा-वीस नव्हे तर तब्बल 155 जवळपास रुग्ण त्यात कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहे.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

सुरवातीला केवळ 5 रुग्ण झाडेगाव येथे आढळले होते. त्यामुळे प्रशासनाने गावात कोरोना चाचणी लावत सर्वांचे स्वॅब घेणे जरुरीचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही पॉझिटीव्ह रुग्ण संपर्कात येऊन गावच हॉटस्पॉट बनले आहे. उशिरा का होईना पंचायत समिती प्रशासन आणि पोलिस प्रशासन कामाला लागले असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे लागले आहे.

May be an image of one or more people, people standing, tree, road and sky

141 व्यक्तींच्या माध्यमातील किती लोक प्रादुर्भाव झाल्यामुळे पॉझिटीव्ह येतात आणि किती निगेटिव्ह हे अहवाल आल्यानंतरच ठरणार आहे. गावात येण्याचा आणि बाहेर जाण्याचा रस्ता सील करण्यात आला असून, कोविड कंनेटमेण्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

हेही वाचा - 28 वर्षीय महिलेला तलाठ्याने शेतीच्या नोंदीसाठी केली मागणी

यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत, जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने! - Akola  Marathi News Towards Buldana District Lockdown | Akola City and Rural  Marathi News - eSakal

 पॉझिटीव्ह व्यक्तींची व्यवस्था काय
गावात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेली व्यक्ती आढळल्यामुळे त्यांना सध्या घरीच आयसोलेशन कक्ष म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परंतु, त्यांना घरीच ठेवणे हे संयुक्तिक नसून, यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना एका विशिष्ट कक्षात ठेवून उपचार देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणा कारवाई करत असल्याचेही समजते. 

May be an image of outdoors and tree
 

 गुरां-ढोरांचा प्रश्‍न
झाडेगाव येथील बहुतांश व्यक्ती ही शेतकरी असून, ते गावातील एका धार्मिक कार्यक्रमात असताना त्यांना बाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे त्यांना आता विलगीकरण करण्यात येऊन घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या पाळीव प्राण्याच्या चार्‍यापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, शेतीविषयक कामांनाही बे्रक लागणार आहे. 

हेही वाचा - शहरातील फक्त पाच पेट्रोलपंप अत्यावश्यक सेवेसाठी राहणार सुरू

 संपूर्ण गावाचे घेणार स्वॅब
गावात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर आता प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, गावातील प्रत्येक व्यक्तीचे स्वॅब घेण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसापासून येथे स्वॅब घेण्यासाठी कॅम्पही लावण्यात आला आहे. 

 स्थानिक प्रशासनाकडून दिरंगाई
झाडेगाव येथील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना गावात असलेल्या सर्व रुग्णांना ग्रामपंचायत किंवा शाळेत स्वतंत्र कोविड कक्ष स्थापन करून तिथे त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे अशी मागणी गावकर्‍यांनी प्रशासनाला केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावात संख्या झपाट्याने वाढली असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी निवेदन सुद्धा सादर करण्यात आले आहे. 

 गावातील नागरिकांना आव्हान केले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून दखल घेऊन तात्काळ कॅम्प लावला. त्यामध्ये 213 स्वॅब घेण्यात आले असता 141 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. वेळीच तपासणी झाली नसती तर ही संख्या खूप वाढली असती. आता उपाय योजना म्हणुन स्थानिक ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळे तालुका व जिल्हास्तरावरुन तात्काळ उपाय योजना होणे गरजेचे आहे. गावात निर्जतुंकिकरण अजुनही झाले नाही. कोरोना बाधित रुग्णावर प्रभावी असे उपचार सुरु नाही. यंत्रणेकडून वेळीच पाउले उचलली गेली नाही. कोरोनाचा महाभंयकर अधिक उद्रेक होऊन गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक संघटनांना आव्हान करुन योग्य ती मदत तात्काळ द्यावी. कठोर नियमाची अंमलबजावणी करुन परिसरात व तालुक्यातील नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता नियोजन गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना नियमित उपचार, सूचना व आरोग्यविषयी सुविधा पुरवित त्यांना धिर देण्यासाठी प्रयत्नशिल करावे.
- प्रशांत तायडे, झाडेगांव.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana Corona News Corona eruption; The village became a hotspot overnight