हातात तलवारी घेऊन नृत्य करणं भोवलं, हाजी राशिदखॉं यांच्या वाढदिवसाचा व्हिडीओ व्हायरल

Akola Buldana Marathi News Dancing with sword in hand Malkapur Haji Rashidkhon birthday video viral
Akola Buldana Marathi News Dancing with sword in hand Malkapur Haji Rashidkhon birthday video viral

मलकापूर (जि.बुलडाणा) : सध्या सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढदिवसाचा केक कधी तलवारीने कापण्याचा तर कधी तलवार हवेत फिरवत आपला मोठेपणा मिरविण्याची क्रेझ वाढत आहे.

धारदार तलवारी कार्यक्रमाच्या स्थळी हाताळणे हा गुन्हा असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या समर्थकांनी त्यांच्या  वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी लखलखती तलवार हवेत फिरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करत स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे.

यामुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे . दुसरीकडे डि.बी पथकातील पोलिसांनी उशिरा दोघा युवकांनाअटक करून त्यांच्याकडून ५ तलवारी जप्त केल्या असून त्यांचे विरुद्ध आर्म अॅक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहे.

वाढदिवशी काहीतरी वेगळे करत प्रसिद्धी मिळविण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून नेत्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचा सपाटा सुरु आहे. यात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारी आणि चाकूचा वापर सर्रास वाढला आहे. याचीच पुनरावृत्ती करत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

मात्र वारंवार अशा प्रकारचे स्टंट पाहून नागरिकांकडून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेचे उपनगरध्यक्ष हाजी रशीद खा जमादार यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी लखलखत्या तलवारी हवेत फिरविल्याचे चे व्हिडीओ व्हायरल करत स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे.  

मलकापूर शहरातील नगर पालिकेच्या शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यान्नि असंख्य तलवारी हवेत फिरविल्या एव्हडेच नव्हे तर विविध प्रकारचे नारे हि यावेळी दिल्याने शहरात खळबळ उडाली. मलकापूर शहर मागील काही दिवसांपासून संवेदनशील होत चालायचे मागील काही दंगलीवरून दिसून येते. अश्यातच रात्री तलवारी निघाल्याने  नागरिकांकडून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दुसरीकडे सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने डि.बी.पथकातील पोलिसांनी दखल घेत रात्री उशिरा दोघा युवकांना अटक करून त्यांच्याकडून ५ तलवारी जप्त केल्या असून त्यांचे विरुद्ध आर्म ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com