‘विजय’ मिळविण्यासाठी ‘राज’ कारणाची ‘शिंदे’शाही !

अरूण जैन 
Thursday, 27 August 2020

अगदी विद्यार्थिदशेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला पंचविशीतला नवयुवक विजयराज शिंदे शिवसेनेत दाखल होतो. पाहता-पाहता नगरपालिकेची निवडणूक लढतो.... निवडून येतो..... सभापती बनतो..... शिवसेनेचा तालुकाप्रमुख... जिल्हा प्रमुख बनतो एक दोन नव्हे तर पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढतो आणि तीन वेळा विजयश्री खेचून आणतो.

बुलडाणा : राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. हे सबंध महाराष्ट्र सध्या अनुभवतो आहे. एकमेकांच्या विरोधात लढणारे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. मग अशावेळी बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे भाजपच्या तंबूत दाखल झाले तर त्यात नवल कसले !

अगदी विद्यार्थिदशेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला पंचविशीतला नवयुवक विजयराज शिंदे शिवसेनेत दाखल होतो. पाहता-पाहता नगरपालिकेची निवडणूक लढतो.... निवडून येतो..... सभापती बनतो..... शिवसेनेचा तालुकाप्रमुख... जिल्हा प्रमुख बनतो एक दोन नव्हे तर पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढतो आणि तीन वेळा विजयश्री खेचून आणतो.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ही साधी गोष्ट नाही मात्र; असे असताना त्यांच्यावर वारंवार पक्ष बदलण्याची वेळ का यावी हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

Buldana : Vijayraj Shine leaves ShivSena | Sarkarnama

१९९५ पासून विजयराज शिंदे यांच्या विधानसभेच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये कधी पडले, तर कधी विजयी झाले.

शिवसेनेतील ‘वंचित’ राजेंचा आज भाजप प्रवेश, मुंबईत  देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

अत्यल्पसंख्यांक समाजातून आलेल्या या माणसाने आपल्या कामाच्या व संपर्काच्या झंझावाताने बुलडाणा विधानसभा मतदारसंघ एकदा नव्हे तर हजार वेळा पिंजून काढला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीने ...

त्यामुळे त्यांना ओळखत नाही असा माणूस या मतदारसंघात सापडणे कठीण आहे. हीच ओळख त्यांनी विधानसभेतील आपल्या प्रश्नांच्या व भाषणांच्या बळावर महाराष्ट्रातही मिळविली.

ही लोकप्रियताच त्यांच्या पक्षातील जिल्हास्तरीय नेतृत्वाला खटकत होती. यामुळे गेल्या पाच-सात वर्षांपासून शिवसेनेच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना वाळीत टाकण्याची भूमिका घेतली.

कोणत्याही बैठका असो, मेळावा असो, महत्त्वाचे कार्यक्रम असो त्यांना निमंत्रण दिले जात नव्हते. तीन वेळा लोक प्रतिनिधी असलेल्या या व्यक्तिमत्त्वाने हा वाळीतपणाही पचवीला.

मात्र त्याची हद्द झाली ती २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. तोपर्यंत शिवसेनेच्या इतर बहुतांश पदाधिकारी यांनी श्री शिंदे यांना कडाडून विरोध केला. प्रसंगी राजीनामा अस्त्र उगारले आणि पक्षनेतृत्वाला शिंदे यांची उमेदवारी कापण्याला भाग पाडले.

vijayraj shinde | Sarkarnama
अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवायची परंतु कोणता झेंडा हाती घ्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. सर्वच जाती-धर्मांमध्ये परीचित आणि संपर्क असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

बुलडाणा जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघ अर्थात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे, ही बाब लक्षात घेऊन व कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन त्यांनी निवडणुकीपुरता वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आणि वंचितच्या लहानथोर मंडळीने श्री. शिंदे यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतले.

शिवसेनेकडून तीनवेळा आमदार झालेले ...

पक्षातून झालेला अन्याय व जनभावना या बळावर श्री. शिंदे यांना भारिप-बहुजन महासंघाच्या अर्थात वंचित च्या बॅनरखाली जेमतेम आठ दिवसाच्या प्रचार यंत्रणेतून विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. असे असतानाही त्यांनी वंचितला सोडचिठ्ठी देऊन भाजपचा रस्ता का निवडला? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

श्री शिंदे यांनी काळाची पावले ओळखली वंचितच्या मर्यादा ही त्यांच्या लक्षात आल्या आणि एक सक्षम पर्याय म्हणून भाजप आपल्यासाठी योग्य ठरू शकतो हे त्यांच्या लक्षात आले. वंचितमध्ये गेले असले तरी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरचा भगवा कधी उतरू दिला नाही.

तो भगवा काढण्याची त्यांची इच्छाही नव्हती परंतु परिस्थिती तशी निर्माण करण्यात आली व त्या जाळ्यात ते सापडले.परंतु विपरित परिस्थितीतून मार्ग काढणारा नेता म्हणून विजयराज शिंदे यांची ओळख आहे.

त्यामुळे त्यांनी थेट भाजपच्या नेत्यांशी संपर्क सुरू केला. सोयीच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांना फारसा भाव दिला नाही. परंतु शांत बसतील ते विजयराज शिंदे कसले त्यांनी वरिष्ठ पातळीवरील अर्थात संघ मुख्यालयातील नेत्यांशी संधान बांधून भाजप प्रवेशाचा मार्ग स्वतःच प्रशस्त करून घेतला. मग अशावेळी जिल्ह्यातील नेत्यांना त्यांच्या पक्ष प्रवेशाला हजेरी लावावी लागली तर त्यात नवल कसले !

एकंदरीत शिंदे यांच्या शिवसेनेतून वंचित व वंचित मधून भाजपमध्ये येण्याला त्यांच्या इच्छे पेक्षा त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली परिस्थितीच कारणीभूत ठरली असेच म्हणावे लागेल. भाजपमध्येही त्यांच्यासमोर प्रस्थापितांना बाजूला सारून, बरोबरीतच्यांना मागे टाकून, पुढे जाण्याची कसरत करावी लागणार आहे, हे निश्चित !
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola buldana news shivsena leader vijaraj shinde joined bjp