अकाेला : वीज मीटरमध्ये फेरफार, महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण

दोघांवर गुन्हे दाखल एक अटकत, एक फरार
Beating of MSEB official
Beating of MSEB officialsakal

तेल्हारा : थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकाच्या दुकानात असलेल्या वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. यावरून कर्मचाऱ्यांनी संबंधित दुकान मालकाला विचारणा केली असता, दोघांनी सहाय्यक अभियंतांना यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तपासणीसाठी काढलेले मीटरही आरोपीकडून फोडण्यात आल्याची घटना शहरात ता. २१ जून रोजी घडली.

येथील शेगाव रोडवर ता. २१ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता आकाश गुप्ता हे कर्मचाऱ्यांसह थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले असता, येथील वीज ग्राहकाच्या फर्निचर दुकानात तपासणी करताना वीज मीटरमध्ये अवैध फेरफार केल्याचे त्यांना आढळून आले, याबाबत दुकानदाराला विचारणा केली असता, शेख जाकीर खाँ लाल खाँ, शेख जमीर खाँ लाल खाँ यांनी सहाय्यक अभियंत्यास लाथाबुक्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व तपासणीसाठी काढलेले महावितरणच्या मालकीचे वीज मीटर अधिकाऱ्याच्या हातातून हिसकावून रोडवर आपटून फोडले.

या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता आकाश अजयकुमार गुप्ता यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शेख जाकीर खाँ लाल खाँ, शेख जमीर खाँ लाल खाँ (दोघेही रा. तेल्हारा) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा करून अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सोबत असणारे वीज कर्मचारी नीलेश होमपारखे, कमलेश गासे यांनी आरोपींना समजण्याचा प्रयत्न, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी तातडीने घटनेची माहिती शहर पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, तर दुसार फरार होण्यास यशस्वी झाला आहे. शहर पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश धामोडे पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com