भरवस्तीतून नेला कोरोना संसर्गित मृतदेह, नागरिकांचा रोष, कर्मचारी पळाले अन् चिताग्णी दिला...

Akola contagious body set on fire by women officials, citizens angry over administration
Akola contagious body set on fire by women officials, citizens angry over administration

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा)  ः  कोविड सेंटरमध्ये करुणा संसर्ग बाधित एका 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा 21 जुलै रोजी सायंकाळी मृत्यू झाला. सदर व्यक्तीचा मृतदेह स्वर्ग रथातून स्थानिक वैकुंठधाम स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यावेळी संसर्गित मृतकाचा मृतदेह भरवस्तीतून का नेला म्हणून काही नागरिक स्मशानभूमीत पोहोचले व त्यांनी संताप व्यक्त केला. संतप्त झालेल्या काहींनी कर्मचाऱ्यावर धाव घेताच त्यांनी मृतदेह स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर सोडून पळ काढला.

कोविड मृतकाच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेने वेगळी व्यवस्था करावी. तसेच भरवस्तीतून मृतदेह येऊ नये अशी मागणी संतप्त नागरिक करीत होते. यावेळी काहीही प्रतिष्ठित नागरिकानी नगराध्यक्ष यांच्याशी संपर्क करून घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली, तर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना भ्रमणध्वनीवरून घडलेल्या या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर पालकमंत्री यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन मृतदेहाची अवहेलना होऊ न देता अंत्यसंस्कार पार पाडा असे निर्देश दिले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

काही वेळातच ग्रामीण रूग्णालयाच्या आरोग्य अधीक्षक डॉ. अस्मा खान, पालिका मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, स्मशान भूमीत पोचले. त्यावेळी प्रशासनाने कोविंड मृतकाच्या अंत्यसंस्कार संदर्भात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत जाब विचारला. काही वेळ स्मशान भूमी परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

त्यावेळी प्रसंगावधान राखून दोघे महिला अधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह उचलून चितेवर ठेवला व स्वतः सरण रचून चिताग्नी दिला. स्मशानभूमीत उपस्थित असंख्य प्रतिष्ठित व्यक्ती व राजकीय पदाधिकाऱ्यापैकी कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. मात्र दोन महिला अधिकाऱ्यांनी करुणा संसर्ग बाधित व्यक्तीच्या मृत्यू देहा वर स्वतः पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार पार पाडून खऱ्या अर्थाने जिजाऊ सावित्रीच्या लेकी असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली.

कोरोना संसर्ग झालेल्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर भरवस्तीतुन स्वर्ग रथ का नेला म्हणून संतापलेल्या नागरिकांनी कोरोना वारियर्स कर्मचाऱ्यांच्या दिशेने धाव घेतली. त्या कर्मचाऱ्यांनी वैकुंठधाम स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर मृतदेह सोडून पळ काढला.

काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर स्वतः वैद्यकीय अधीक्षक व पालिका मुख्याधिकारी या महिला अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मृतदेहाला चिताअग्नि दिला. दरम्यान स्मशानभूमीत उपस्थित नागरिकांच्या समक्ष महिला अधिकाऱ्यांनी स्वतः मृतदेह उचलून चितेवर ठेवला. सरण रचून चिताअग्नि देऊन खऱ्या अर्थाने जिजाऊ सावित्री आईच्या लेखी असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली.

कर्मचाऱ्यांवर वचक नाही
आरोग्य प्रशासन व पालिका प्रशासना च्या हेड दोन्ही महिला अधिकारी आहेत करुणा संसर्ग बाधित व्यक्तीच्या मृत्यू नंतर क्‍लास फोर च्या कर्मचाऱ्यांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी देण्यात आली. क्‍लास थ्री च्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावल्याने प्रभारी आरोग्य निरीक्षक कैलास भगत यांच्यासह तीन स्वच्छता कर्मचारी अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी उपस्थित होते. मात्र नागरिकांचा रोज बघून त्यांनी पळ काढला क्‍लास थ्रीचे कर्मचारी उपस्थित असते तर त्यांनी परिस्थिती हॅंडल केली असती अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.


जबाबदारी टाळणाऱ्यांवर कारवाई होणार का
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची नव्हती मात्र मृतदेहांची अवहेलना होऊ नये म्हणून महिला अधिकाऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागला. महिला अधिकाऱ्यांनी वेळेस घेतलेल्या भूमिकेनंतर नागरिकांचा रोष कमी झाला. मात्र ज्या क्‍लास थ्री कर्मचाऱ्यांनी जबाबदारी टाळली त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com