Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

Akola Corona News Coronavirus Changed virus infection in Akola! Coronavirus
Akola Corona News Coronavirus Changed virus infection in Akola! Coronavirus

अकोला :  कोरोना विषाणूमध्ये परिवर्तन होत असून, या बदलेल्या विषाणूचा अधिक वेगावे संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून संसर्ग बांधितांची वाढणारी संख्या बघता बदलेल्या विषाणूचा संसर्ग अकोला जिल्ह्यात झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याबाबत आताच भाष्य करण्यात आले नसले तरी केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळणाऱ्या अहवालानंतर कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी दिली. त्यांनी बचावासाठी नागरिकांनी हात धुने, मास्क वापरणे आणि गर्दीत जाण्याचे टाळण्याच्या त्रीसुत्रीचा वापर करण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे.


अमरावती विभागातील अकोल्या जिल्ह्यासह अमरावती व यवतमाळ येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चाचणी झालेल्या रुग्णांमध्ये बांधितांची संख्या अमरावती व यवतमाळमध्ये ५० टक्केपेक्क्षा जास्त आहे तर अकोल्यातही ३५ टक्क्यांवर प्रमाण आहे. ही स्थिती गंभीर असून, नागरिकांनी काळजी न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ज्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग वाढत आहे.

ते बघता कोरोना विषाणूमध्ये परिवर्तन झाल्याची दाट शक्यता आहे. विषाणूच्या ट्रान्समिशनची किंवा एका व्यक्तीपासून दुसरे व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची व्हायरस क्षमता वाढलेली आहे. एका कुटुंबामध्ये पूर्णच्या पूर्ण सदस्यांना संसर्ग होत आहे. नागपूरपासून ते औरंगाबादपर्यंत सगळ्याच जिल्ह्यांमधून कमी-अधीक प्रमाणात काही अंशी असे रुग्ण बघावयास मिळत आहे. त्याचा अर्थ असा आहे की या विषाणू काही बदल निश्चितपणे होत आहेत. एका व्यक्तीपासून दुसरा व्यक्तीपर्यंत पसार होण्याची त्याची ताकद वाढली हे निश्चित दिसते. त्याच्या पासून होणारा आजार अजून तेवढा घातक आहे असे दिसत नाही. मात्र निष्काळजी बाळगून चालणार नाही, असे सोळुंखे यांनी सांगितले.

हेही वाचा - मास्क घालूनच बाहेर पडा नाही तर दंड, आतापर्यंत ४५ हजारांचा दंड झाला वसूल

पंधरा दिवस महत्त्वाचे
बाजारात, हॉटेलमध्ये होणारी गर्दी, मास्क न वापणाऱ्या नागरिकांसोबत व्यावसायिकांची संख्या मोठी असल्याने संसर्गाची भिती अधिकच वाढत आहे. बदलेला विषाणू ज्या प्रमाणात वेगाने पसरतो आहे ते बघता काळजी घेणे हाच एक त्यावर उपाय आहे. त्यासाठी येणारे पंधरा दिवस महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - कुणी चोरली ग्रामीण रुग्णालयातील कोरोनाची लस?

बदलेल्या वातावरणाचाही परिणाम
कोरोना विषाणूची संख्या वाढण्यामागे गत काही दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलाचाही मोठा परिणाम दिसून येत आहे. वातावरणातील तापमाणात झालेला मोठा बदल आणि दमट हवामान यामुळे विषाणूसाठी पोषण वातावरण निर्माण होत असल्याचे कोविड राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी सांगितले.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com