हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी

akola corona news lockdown again hotels closed
akola corona news lockdown again hotels closed

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश देवून नवीन नियमावली लागू करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यास सांगितले आहे. नवीन नियमावलीनुसार अनलॉकमध्ये देण्यात आलेल्या सवलती रद्द करून आता बाजारातील व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. हे निर्बंध १ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार आहेत.


अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून सदर भागाच्या सीमा निश्चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरी आणि ग्रामीण भागासाठी सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत.


यात सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापना ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे, ते उद्योग नियमितपणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये ही १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. सर्व प्रकारच्या खासगी कार्यालयातील आस्थापना या एकूण १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील.

ग्राहकांनी खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडे खरेदी करावी. शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता वधू व वर पक्षासह पंचवीस व्यक्तींना परवानगी राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहील. मालवाहतूक की नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी, तीन चाकीमध्ये चालका व्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील.

हेही वाचा - Lockdown :संचारबंदीत शिक्षकांनी ऑनलाईन क्लासेस शाळेत घ्यावे की घरून घ्यावे?

बसमध्ये ५० टक्के प्रवाशी
आंतर जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टंसिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीसाठी परवानगी राहील. यासाठी विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे नियोजन करतील.
..........................
नवीन नियमावतील इतर सूचना
- सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात सुरू राहील.
-भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहील.
- मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहिल.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!
............................................
हॉटेल, शाळा-महाविद्यालये बंद
ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलने संचारबंदी कालावधीत बंद राहतील.
.........................
पुन्हा पाच दिवस ९ ते ५ व्यवहार
बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहतील. आठवडाअखेर शनिवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुकाने बंद राहतील.
..............
हे राहणार सुरू
आठवडाअखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दूध विक्रेते यांची दुकाने ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत आठवड्याचे संपूर्ण सात दिवस नियमितपणे सुरू राहतील.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com