कौतुकास्पद...सर्वधर्म आपत्कालीन स्वयंसेवी संस्थेची सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

तीन परिसरामध्ये कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. कोरोना योद्धा म्हणून या कंटेनमेंट झोनवर पोलिस खडा पहारा देत आहेत. परंतु, कौटुंबिक जबाबदारी पार पाडून आपली ड्युटी करणाऱ्या पोलिस बांधवांना मदतीचा हात देत या आपत्कलीन संस्थेचे सदस्य पोलिसांसोबत कंटेनमेंट झोनवर ‘सास’ चे प्रमुख दुले खान युसूफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली आपली ड्युटी बजावत आहेत.

पातूर (जि. अकोला) : देशातील मोठ्या शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाने मजल मारत जिल्ह्याचा आकडा 600 च्या आसपास करत आहे. सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रत्येक जण आपल्या जिवाची पर्वा न करता स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यात मग्न आहेत. परंतु, पातूर शहरात सर्वधर्म आपत्कालीन स्वयंसेवी संस्था (सास) अजूनही त्याच जोमाने आपले स्वयंसेवी कार्य करत असल्याचे दिसत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत योद्धा म्हणून काम पाहत आहेत.

क्लिक करा- अरे अरे अकोल्यात कोरोनामुळे मृत्यू सत्र सुरूच; एकाच दिवशी...

रात्री-अपरात्रीही बजावत आहे कर्तव्य
शहरात कोरोना बाधित रुग्ण निघाल्यामुळे तीन परिसरामध्ये कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. कोरोना योद्धा म्हणून या कंटेनमेंट झोनवर पोलिस खडा पहारा देत आहेत. परंतु, कौटुंबिक जबाबदारी पार पाडून आपली ड्युटी करणाऱ्या पोलिस बांधवांना मदतीचा हात देत या आपत्कलीन संस्थेचे सदस्य पोलिसांसोबत कंटेनमेंट झोनवर ‘सास’ चे प्रमुख दुले खान युसूफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली आपली ड्युटी बजावत आहेत. स्थानिक भागातील लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगून शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी लोकांना सूचित करत आहेत.

एवढेच नाही तर शहरासह तालुक्यात कोठेही अपघात झाला तर ‘सास’ चे प्रमुख रात्री-अपरात्री अपघात ग्रस्तांना दवाखान्यात नेऊन स्वतः त्यांची सेवा सुद्धा करतात. परिसरात गोरगरीब रुग्णांना त्यांची सांगली मदत होत आहे. या सेवा भावातून त्यांनी आतापर्यंत अनेकांचे प्राण सुद्धा वाचवले आहेत. एसडीपीओ रोहिणी सोळंके यांनी कंटेनमेंट झोन व चेक पोस्टवर भेट देऊन आढावा घेतला असता, ‘सास’ सदस्य पोलिस मित्र बनून कोरोनाशी लढा देत असताना निदर्शनास आल्यामुळे त्यांनी ‘सास’ प्रमुख व त्यांच्या पूर्ण टीमचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने, एपीआय गणेश नावकार, एपीआय अमोल गोरे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Corona Warriors became members of ‘Saas’