बसस्थानकावर चोरी करण्यासाठी फिरत होता रिव्हॉलवर घेऊन

Desi Katta found again in Akola
Desi Katta found again in Akola

अकोला :  दहशतवाद विरोधी पथकाने लक्झरी बस स्थानक परिसरात एका आरोपीला देशी बनावटीच्या रिव्हॉलवर व दोन जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी अटक केली.

दहशतवाद विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारावर भगतवाडी अकोला येथे राहणारा सराइत गुन्हेगार हमीदखान राशिदखान (वय ४८) हा हा लक्झरी बस स्थानक परिसरात देशी रिव्हॉलवर सोबत घेवून जबरीचोंरीच्या उद्देशाने फिरताना आढळून आला. आरोपी हमीद खान राशिद खानला ताब्यात घेवून त्याची तपासणी केली असता पोटाला कंबरेच्यावर उजव्या बाजूस एक देशी बनावटीची रिव्हॉलवार (मूल्य १० हजार) व दो राउंड काडतूस लपवून ठेवली असल्याचे दिसून आले. बिनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
..............
अकोला शस्त्र येतात कोठून?
अकोला शहरात गेल्या वर्षभरात तीन-चार ठिकाणी देशी कट्टा बाळगणारे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडे हे देशी कट्टे येतात कोठून याबाबत पोलिसांनी आतापर्यंत कोणताही तपास केल्याचे दिसत नाही. अवघ्या १०-२० हजारात आरोपींच्या हातात घातक शस्त्र पडत असून हे पोलिसांसाठी एक आव्हानच आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com