सततची नापिकीमुळे आणि बँकेच्या कर्जामुळे पिंजर येथील शेतकऱ्यांची आत्महत्या

Akola Crime News A farmer in Pinjar lost his life
Akola Crime News A farmer in Pinjar lost his life

पिंजर (जि.अकोला) :  सततची नापिकीमुळे आणि बँकेचे असलेल्या कर्जामुळे येथील युवा शेतकरी महादेव मोतीराम इंगळे (वय ४५) यांनी ता. १९ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


महादेवराव मोतीराम इंगळे यांचे पिंजरच्या बसस्थाकावर किरकोळ चप्पल विक्रीचे दुकान होते. त्यांचेकडे तीन एकर शेती आहे. गेल्या एक वर्षांपासून कोरोनामुळे चप्पलचा व्यवसाय बुडाला होता. कसा बसा त्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. गुरुवारी परत लॉकडाउनची घोषणा झाली.

त्यात पिंजर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, बुलडाणा अर्बन बँकेचे कर्ज, महिला-पुरुष बचत गटांचे कर्ज, खासगी कर्ज यामुळे मृतक हे नेहमी विचारात असायचे. गेल्या काही दिवसांपासून ते बँकेच्या कर्जामुळे, व इतर कर्जामुळे त्रस्त होते. या विवंचनेतच त्यांनी ता.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मागे पत्नी, आई, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com