Akola : धनगर समाजाला दिलेला शब्द राज्य शासनाने फिरविला; बबनराव रानगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Dhangar community Malhar Sena Babanrao Range

Akola : धनगर समाजाला दिलेला शब्द राज्य शासनाने फिरविला; बबनराव रानगे

शिरपूर जैन : धनगर महासंघ व मल्हार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जनसंपर्क अभियान कार्यक्रमा अंतर्गत एक ऑक्टोंबर रोजी शिरपूर जैन येथे गुणवंतांच्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने बोलतांना,धनगर समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द या राज्य शासनाने फिरवला, असा घनाघाती आरोप मल्हार सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बबनराव रानगे यांनी बोलताना केला.

काल दिनांक एक ऑक्टोंबर रोजी धनगर महासंघ व मल्हार सेना यांच्या विद्यमाने शिरपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. धनगर महासंघ व मल्हार सेनेच्या जणसंपर्क अभियान अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द मागच्या देवेंद्र फडणीस यांच्या सरकारने फिरवला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

राज्य शासन आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवून मेंढपाळांचा प्रश्न पुढे करुन दिशाभूल करीत आहे. कारण मेंढपाळांची संख्या आज बोटावर मोजन्या इतकीच शिल्लक उरली आहे.राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ आहे. पण त्या महामंडळाला एक रुपयाचा निधी सुद्धा या राज्य शासनाने दिलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितले होते की एक हजार कोटी रु आम्ही या महामंडळाला देऊ मात्र प्रत्यक्षात एक रुपया सुद्धा त्यांनी दिला नाही व धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

खोटे बोलून फसवणूक करायची असा एक कलमी कार्यक्रम या राज्य शासनाचा धनगर समाजाबद्दल सुरू आहे .याला कुठेतरी आळा घालायचा असेल तर धनगर समाजाने संघटित झाले पाहिजे व आता रस्त्यावरची लढाई लढाण्यासाठी समाजाने सज्ज झाले पाहिजे . असा एक प्रकारे इशारा त्यांनी राज्य शासनाला दिला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रामध्ये १३ टक्के धनगर समाज असून विधानसभेत फक्त एक आमदार निवडून येतो यापेक्षा दुर्भाग्य कुठले असू शकत नाही असेही ते बोलताना म्हणाले.

त्यामुळे धनगर समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे लक्षात येते गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यातून बोलताना समाज हिताच्या इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. वाशिम जिल्ह्यातून व शिरपूर येथील आयआयटी कॉलेज मुबई व जोधपूर येथे प्रवेश मिळवीणारे कु. अंजली वाढे व अनिकेत शंखे ,तसेच नीट मध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या अनुराग डांगे अनसिंग ,अभय मूखमाले वारा जहागीर, हर्षल सुधीर ढवळे शिरपूर ,कु. प्राजक्ता गजानन कष्टे कंझारा ,विवेक राजेश कानडे पारडी (ताड ),कु.कोमल मनोहर वाहे मालेगाव, तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविणाऱ्या कु. मानकर या गुणवंतांचा धनगर महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोरखेड येथील सरपंच सुनीता मीटकरी या होत्या प्रमुख उपस्थिती, अशोकराव देवकते मल्हार सेना उपप्रमुख महाराष्ट्र राज्य, डॉ अलकाताई गोडे अहिल्या वहिनी प्रदेशाध्यक्ष ,अंकुशराव निर्मल कर्मचारी महासंघ अध्यक्ष,कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायणराव बोबडे धनगर महासंघ उपप्रमुख महाराष्ट्र राज्य, यांनी केले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गावंडे तर आभार प्रदर्शन बोबडे सर यांनी केले.