Akola: जिल्ह्यातील ५१ एसटी कर्मचारी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
जिल्ह्यातील ५१ एसटी कर्मचारी निलंबित

अकोला : जिल्ह्यातील ५१ एसटी कर्मचारी निलंबित

अकोला : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अकोला व वाशीम जिल्ह्यातील ५१ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. त्यात रिसोड, मंगरुळपीर, वाशीम, अकोट, तेल्हारा व व मूर्तिजापूर आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अकोल्यातील दोन्ही आगारासह विभागीय मुख्यालय असलेल्या अकोल्यातील कार्यालयात मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये आगारातील चालक, वाहक आणि यांत्रिक पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेली १५ दिवसांपासून संप पुकारला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्मचारी कामावर परतले नाहीत. बंद पडणाऱ्या आगाराची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच गेली. सोमवारच्या शासन निर्णयानंतरही संपाची धग कायम आहे. मंगळवारपासून हा संप अधिक चिघळला. राज्यभरातील सर्व आगारांतील वाहतूक बंद झाली. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा सपाटा लावला.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

आतापर्यंत अकोला विभागातील एकूण ५१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आणखी हा आकडा वाढण्याची शक्यता असून या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खासगी गाड्या आगारामध्ये या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत. विशेष: ग्रामीण भागातील अनेक प्रवाशांना या संपाची कल्पना नसल्यामुळे त्यांना बस आगारातून आल्या पावली परत जावे लागत आहे. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी वाहनांना आगार परिसरातून प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आगारनिहाय्य निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या रिसोड - १० मंगरुळपीर - १० वाशीम - १२ अकोट - ४ तेल्हारा - ९ मूर्तिजापूर - ६

loading image
go to top