अकोला : श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Dumdumle city Gajanan maharaj Palkhi welcome

अकोला : श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत!

अकोला : श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे आषाढी एकादशीसाठी निघालेली श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे बुधवारी सकाळी भौर येथून अकोल्यात आगमण झाले. भाविकांनी माऊलीच्या पालखीचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले.

श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेल्या पायदळ दिंडी पालखीचा मंगळवारी भौरद येथे मुक्काम होता. याठिकाणी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. बुधवारी सकाळीच पालखी डाबकी रोड मार्गे अकोला शहरात दाखल झाली. स्वागतासाठी चौकाचौकात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची आणि श्रीसंत गजानन महाराज यांची मूर्ती ठेवून भाविकांनी पाखलीत सहभागी वारकऱ्यांसाठी विविध साहित्याचे वाटप केले. जागोजागी फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागत कमानी, फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आले होते. उत्साहपूर्ण वातावरणात वारकरी व भाविकांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले. दुपारी ४ वाजतानंतर मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मैदानावर पालखी सोहळा विसावला. येथे रात्री ११ वन वाजेपर्यंत भाविकांना पालखीचे दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

वारकऱ्यांना साहित्याचे वाटप

कोविडच्या साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंधामुळे पालखी सोहळ्याला मर्यादा होता. यावर्षी कोणत्याही निर्बंधाशिवाय श्री गजानन महाराज पालखीचे राजराजेश्वर नगरीत आगमन झाले. वारकरी व भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. ही पायदळ वारी भजनी दिंडी, अश्वासह सुमारे ७०० वारकरी ध्वज घेवून सहभागी झाले आहेत. अकोला पालखी सत्कार समितीने व श्रींच्या भक्तांनी परंपरेनुसार ‘श्रीं’ च्या पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. भाविकांना श्रींचे दर्शन व्हावे, यांसाठी अकोला शहराच्या प्रमुख रस्त्याने श्रींच्या पालखीचे शोभायात्रा काढण्यात आली. जागोजागी वारकऱ्यांना शितपेय व आवश्यक साहित्याचे वाटप भाविकांतर्फे करण्यात आले.

भाजपातर्फे पालखीचे स्वागत

अकोला विदर्भाची पंढरी संत गजानन महाराजांची पालखी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात आगमन होताच श्रीचे दर्शन व पूजन करून यंदा चांगला पाऊस येऊन शेतकरी बळीराजा सुखी व्हावा तसेच उद्योगधंद्यांना चांगले दिवस येऊन सर्वांचा कल्याण व्हावा, अशी कामना आमदार रणधीर सावरकर यांच्या वतीने मंजुषा सावरकर यांनी केली. आमदार वसंत खंडेलवाल व आमदार गोवर्धन शर्मा यांनीही पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. याप्रसंगी अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या वतीने अनुप धोत्रे यांनी विशेष पूजा-अर्चना करून श्रींचे दर्शन घेतले.

शिक्षण प्रसारक मंडळातर्फे स्वागत

शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाच्या वतीने जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथून निघालेल्या, श्रीक्षेत्र पंढरपूर वारी ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. तारा हातवळणे, उपाध्यक्ष प्रा. चौरे, कोषाध्यक्ष नानासाहेब कुलकर्णी यांची उपस्थिती होती. मंडळाच्या अध्यक्ष तारा हातवळणे आणि कोषाध्यक्ष नानासाहेब कुलकर्णी यांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन केले.

या मार्गे निघाली पालखी

श्री गजानन पालखीची शोभायात्रा भौरद येथून जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट येथे पोहचली. विश्रामानंतर पालखी डाबकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदीरासमोरून, डाबकी रोड पोलिस स्टेशन, श्रीवास्तव चौक, जयगुरुदेव पेट्रोल पंप, श्री विठ्ठल रुख्मीनी मंदिर, काळा मारोती मंदीर, सुशिल बेकरी समोरून, लोखंडी पुलावरुन सिटी कोतवाली चौककडे रवाना झाली. मुंगीलाल बाजोरीया विद्यालय प्रांगणात पालखीचा रात्री मुक्काम राहणार आहे.

Web Title: Akola Dumdumle City Gajanan Maharaj Palkhi Welcome

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top