अकाेला : अग्नीचे तांडव; लाखोंचे नुकसान

जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याने सात जनावरे होरपळली
Akola farmer loss barn fire animals injured
Akola farmer loss barn fire animals injuredsakal

बाळापूर/ वाडेगाव : तालक्यातील गोरेगाव (बु.) येथील एका जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याने सात जनावरे होरपळली असून, ३५ कोंबड्यांसह त्यांची पिल्ले, जनावरांचे कुटार, चार पोती सोयाबीन भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. आगीत शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले असून, शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

बाळापूर पोलिसांच्या हद्दीतील गोरेगाव (बु.) येथे शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दामोदर गावंडे यांचे गावात घर असून, गावाच्या बाहेर गुरा वासरांचा व शेतीचे साहित्य ठेवण्यासाठी गोठा आहे. शुक्रवारी मध्यरात्री दामोदर गावंडे हे पाणी पिण्यासाठी घरी आले होते व पुन्हा गोठ्याकडे गेले असताना अचानक गोठ्यात आगीचे मोठे लोळ त्यांना दिसले.

त्यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ मदतीला धावून आले. सरपंच दुशंत शेगोकार यांनी तत्काळ गावातील पाण्याच्या बोअरवेल सुरू केल्या. आगीची तीव्रता माेठी असल्याने अकोला येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

आगीत सोयाबीनची चार पोती, जनावरांचा चारा, खुराड्यातील ३५ कोंबड्या, शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले, तर चार बैल, दोन गायी, एक वासरू आगीत होरपळले असून, सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत होरपळून निघाल्याने तीन जनावरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पशुवैद्यकांनी सांगीतले. शनिवारी नायब तहसीलदार श्री. आत्राम व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.

जनावरांना वाचविताना शेतकरी जखमी

शेतकरी दामोदर गावंडे यांना आगीचे लोळ दिसताच त्यांनी गोठ्याचे फाटक तोडून आत प्रवेश केला. यावेळी सातही जनावरे खुट्याला बांधलेली होती. या शेतकऱ्यांने आपल्या प्राणाची बाजी लावून अंगाला चादर गुंडाळत सातही जनावरांना आगीच्या भक्ष्यस्थानातून बाहेर काढले. यावेळी सदर शेतकरी चांगलाच भाजला गेला.

गोठ्याला आग लागल्याने सात जनावरे होरपळली

गोरेगाव (बु.) येथील घटना; ३५ कोंबड्या, कुटार आगीच्या भक्ष्यस्थानी

- चोहट्टा बाजारातही भीषण आग

कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या बैल जोडी, दुधाची गाय वासरू व कोंबड्यांचे लागलेल्या आगीने प्रचंड नुकसान झाले.

- दामोदर गावंडे, शेतकरी, गोरेगाव (बु.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com