शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही अन् अडीच हजारांवर कृषी विक्रेत्यांनी पाळला बंद

मनोज भिवगडे 
Friday, 10 July 2020

कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी 10 ते 12 जुलै या काळात बंद पुकारण्यात आला असून, वऱ्हाडातील अडीच हजारावर कृषी विक्रेते यात सहभागी होणार आहेत. बंदच्या काळात प्रशासनाकडून अद्याप कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

अकोला  ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी 10 ते 12 जुलै या काळात बंद पुकारण्यात आला असून, वऱ्हाडातील अडीच हजारावर कृषी विक्रेते यात सहभागी होणार आहेत. बंदच्या काळात प्रशासनाकडून अद्याप कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करू नये, अशी प्रमुख मागणी केली आहे. याशिवाय इतर मुद्यांबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. परंतु याबाबत अद्याप न्याय न मिळाल्याने अखेरीस शुक्रवार(ता.10) पासून तीन दिवसांचा बंद पुकारला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या बंदमध्ये अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यातील सुमारे अडीच हजारांवर कृषी विक्रेते सहभागी होणार आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे तयारी झाली आहेत. सध्या हंगामात सोयाबीन, मका पिकावर किडनाशक फवारणीची लगबग सुरू आहे.

सोबतच काही ठिकाणी पेरणीनंतरची खत देण्याचीही कामे होत आहे. शिवाय आधी सोयाबीन न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्यासुद्धा होत आहेत. एकाच वेळी शेतीतील विविध कामे सुरू आहेत.

दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याची वेळ अत्यंत कमी केलेली आहे. यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. त्यातच आता तीन दिवसांचा हा बंद शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे. मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी या तीन दिवसात कडकडीत बंद पाळण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

(संपादन-विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Farmers seeds did not germinate and over two and a half thousand agricultural vendors followed suit