स्वतंत्र विदर्भ, मुंबई राज्यासाठी लढा उभारू; गुणरत्न सदावर्ते

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करीत फसवणूक केल्याचा आरोप
Gunaratna Sadavarte announcement
Gunaratna Sadavarte announcementsakal

अकोला : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करीत फसवणूक केल्याचा आरोप असलेले विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते हे गुरुवारी अकोट पोलिसांपुढे चौकशीकरिता सपत्निक उपस्थित झाले होते. तब्बल तीन तास त्यांची चौकशी चाचली. चौकशी आटोपल्यानंतर अकोट येथे माध्यमांसोबत बोलताना कष्टकरी जनसंघ हा पक्ष विदर्भ आणि मुंबई प्रांत स्वतंत्र राज्य बनविण्यासाठी लढा उभारणार असल्याचे सांगितले.

अकोट पोलिस स्टेशनमध्ये विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल होता. त्यानंतर न्यायालयाने पोलिस चौकशी अधिकारी म्हणतील तेंव्हा चौकशीस उपस्थित राहण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन दिला होता. त्यानुसार अकोट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तथा चौकशी अधिकारी प्रकाश अहिरे यांनी गुरुवारी सदावर्ते दाम्पत्याला चौकशीकरिता बोलाविले होते. त्या अनुषंगाने हे दाम्पत्य ता. १६ जून रोजी दूपारी चार वाजताचे दरम्यान अकोटात दाखल झाले होते.

चौकशीदरम्यान हाताच्या पंज्याचे ठसे घेणे आदी कायदेशिर बाबींची पुर्तता करण्यात आली. त्यानंतर आकोट न्यायालयात मान्य केल्यानुसार सदावर्ते यानी आकोट रा.प.म. कर्मचाऱ्यांकडून घेतलेले ७४ हजार ४०० रुपये पोलिसांकडे सोपविले. त्यानंतर प्रश्नोत्तरे होऊन तीन तासानंतर सदावर्ते दांपत्य बाहेर पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com