अकोला : बाळापूर तालुका निर्मिती मागणी पुन्हा चर्चेत

कृती समितीतर्फे बैठकांवर भर, मुंबईत लवकरच आंदोलन करण्याचा निर्णय
Balapur taluka Demand under
Balapur taluka Demand under sakal
Updated on

आखाडा बाळापूर : बाळापूर तालुका निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने पुन्हा हा प्रश्न पटलावर आला आहे. बाळापूर तालुका कृती समितीचे पदाधिकारी, सर्व पक्षीय नेते, व्यापाऱ्यांतर्फे बैठकींद्वारे मोहीम सुरू झाली असून लवकर मुंबई येथे घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

Balapur taluka Demand under
वीज पुरवठा खंडित करण्यासंदर्भातील मेसेज फेक , महावितरणचे आवाहन

आखाडा बाळापूर तालुका निर्मितीचा प्रश्न तीन दशकांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, (cm)उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी तालुका निर्मितीसाठी केवळ आश्वासनांची खैरात केली आहे. परंतु दखल घेतलेली नाही. विधानसभेच्या गत निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख तथा विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(UddhavThakre)यांनी परिसरात झालेल्या सभेत ''सत्ता माझ्या हाती द्या, मी बाळापूर तालुका करून दाखवतो’ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर कोरोनाची (corona)लाट आल्याने हा प्रश्नही मागे पडला. या प्रश्नी तालुका कृती समितीच्या वतीने नुकत्याच काही बैठकी झाल्या.

परिसरातील सर्वपक्षीय नेते, व्यापारी, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, पत्रकार आदींनी उपस्थिती दर्शवून तालुका निर्मितीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.

Balapur taluka Demand under
अकोला : सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा बिगुल वाजला!

.. तर ग्रामस्थांची होईल सोय

कळमनुरी तालुक्यातील वडगाव, रेडगाव ते कळमनुरी अंतर पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्या परिसरातील ग्रामस्थांना कळमनुरी येथे कामासाठी यायचे म्हटले तर दिवस जातो. बाळापूर तालुका झाल्यास अंतर कमी होईल. वेळ व पैशांची बचत होईल, परिसरातील ग्रामस्थांची कामेही मार्गी लागतील, असा सूर बैठकांमधून व्यक्त झाला. तालुका निर्मितीच्या मागणीसाठी २६ जानेवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com