अकोला : ग्रामपंचायत पोटनिवडणूक; मतदान क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर

१८ जानेवारी रोजी स्थानिक सुट्टीचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले
gram panchayat election
gram panchayat electionsakal

अकोला : अकोट तालुक्यातील अकोलखेड, मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव व मधापूर, बाळापूर तालुक्यातील मांजरी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत (Gram Panchayat by-election) मतदारांना मतदान करता यावे, यासाठी संबंधित मतदान क्षेत्रात मंगळवार १८ जानेवारी रोजी स्थानिक सुट्टीचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

gram panchayat election
UP elections : निवडणूक आयोगाची कारवाई, पोलीस निरीक्षक निलंबित

ग्रामपंचायतीच्या रिक्‍त पदाच्‍या पोटनिवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्यांना निवडणुकीच्‍या दिवशी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी मंगळवार १८ जानेवारी रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आस्थापनेवरील क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या अधिकारी, कर्मचारी मजुर, कामगार यांना मतदान करता येणे शक्य व्हावे याकरीता कामाच्या तासामधून दोन तासांची सवलत देण्‍यात यावी, असे आवाहन करण्‍यात येते आहे.

gram panchayat election
पुण्यात नवे निर्बंध? रुग्ण वाढल्यानंतर अजित पवारांची तातडीची बैठक

तीन दिवस मद्यविक्री बंद

पोटनिवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी (ता. १७), मतदानाच्या दिवशी (ता. १८) व मतमोजणीच्या दिवशी (ता. १९) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com