पालकमंत्री बच्चू कडू दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर

मनोज भिवगडे 
Monday, 20 July 2020

राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू बुधवार (ता. 22) व गुरुवार (ता. 23) दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. निर्धारित कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होईल.

अकोला  ः राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू बुधवार (ता. 22) व गुरुवार (ता. 23) दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. निर्धारित कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होईल.

त्यानंतर ते दुपारी 12 वाजेपर्यंत श्रावण महिन्यातील कावड यात्रेबाबत अधिकारी व कावड मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत तालुका स्तरावरील कोविड-19 बाबत आढावा बैठक घेतील. पश्‍चात 5 टक्के अपंग निधी खर्चाबाबत जिल्हा परिषदेचे सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यानंतर 3 ते 4 पर्यंत ते कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत नियोजन भवनात चर्चा करतील. दुपारी 4 वाजता पातुर तालुक्‍यातील वसाळी गावाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6 वाजता वसाळी गावात पोहचल्यानंतर गावकऱ्यांसोबत स्थानिक समस्यांसंदर्भात चर्चा करतील. त्यानंतरचा वेळ राखीव आहे.

अकोल्यात रेल्वे कोच फॅक्‍टरीसाठी 100 कोटीचा प्रस्ताव

गुरुवारी महानला बैठक
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. 23) पालकमंत्री सकाळी 9 वाजता पातुर तालुक्‍यातील वसाळी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करतील. सकाळी 11 वाजता पातुर तालुक्‍यातीलच पांढुर्णा-सोनुना-चोंढी या गावास भेट देवून येथील नागरिकांसोबत चर्चा करतील. दुपारी 1 वाजता बार्शीटाकळी तालुक्‍यातील महानकडे प्रयाण करतील व दुपारी 3 वाजता काटेपूर्णा धरण परिसरात पाटबंधारे व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत उपस्थित राहतील. दुपारी 4 नंतर अकोला शहराकडे प्रयाण करतील व सवडीने अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णाला प्रस्थान करतील.

महाबीजचे पत्र म्हणजे, स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न! : रविकांत तुपकर

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Guardian Minister Bachchu Kadu on a two-day district tour