बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी, जिल्ह्याचा निकाल 90.80  टक्के

विवेक मेतकर
गुरुवार, 16 जुलै 2020

जिल्ह्याचा निकाल 90.80  टक्के लागला आहे. यामध्ये मुलीच अव्वल ठरल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.15 टक्के एवढी आहे. यावर्षीसुद्धा निकालामध्ये मुलींनी भरारी घेतली आहे.

अकोला : कोरोना संकटात १२ वी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची धाकधूक असलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा अखेर दिलासा मिळाला आहे. 12 वीचा ऑनलाइन निकालाची घोषणा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला आहे.

या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 90.80  टक्के लागला आहे. यामध्ये मुलीच अव्वल ठरल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.15 टक्के एवढी आहे. यावर्षीसुद्धा निकालामध्ये मुलींनी भरारी घेतली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 25 हजार 529 नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 25 हजार 468  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

यापैकी 23 हजार 109  विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी 90.80 अशी आहे. उत्तीर्ण 23 हजार 109 विद्यार्थ्यांमध्य 11984 मुले व 11161 मुली आहेत.

मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 87.88 टक्के, तर मुलींची टक्केवारी 94.15 टके अशी आहे.

अकोला जिल्ह्यात सर्वाधिक निकाल पातूर तालुक्याचा 93.08 टक्के लागला आहे. त्याखालोखाल अकोला तालुका 92.85 टक्के, बार्शीटाकळी तालुका 91.13 टक्के, मुर्तीजापूर तालुका 90.38 टक्के, अकोट तालुका 88 .91 टक्के, बाळापूर तालुका 86.98 टक्के व तेल्हारा तालुका 84.91 टक्के असा क्रम आहे.

 

राज्याची स्थिती
राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के
यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला
उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी
उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९३.८८ टक्के
उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८८.०४ टक्के
कला : ८२.६३ टक्के
वाणिज्य : ९१.२७ टक्के
विज्ञान : ९६.९३ टक्के
एमसीव्हीसी : ९५.०७ टक्के
कोकण विभागाची टक्केवारी सर्वाधिक ९५.८९ टक्के
सर्वांत कमी औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के

 

परीक्षेसाठी एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी १५ लाख ५ हजार २७
यामध्ये विद्यार्थी ८ लाख ४३ हजार ५५२
विद्यार्थिनी ६ लाख ६१ हजार ३२५
एकूण ३ हजार३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola hsc result 2020 Girls result in 12th standard, district result is 90.80 percent