अकाेला : तांदळाने भरलेला ट्रक पोलिस ठाण्यात जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola illegal rice truck seized by police

अकाेला : तांदळाने भरलेला ट्रक पोलिस ठाण्यात जमा

मानोरा : शहरातील जनता बँकेच्या बाजूला असलेल्या गल्लीत तांदुळाचा भरलेला ट्रक असल्याची गुप्त माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे यांना मिळताच त्यांनी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांना गोडाऊन मधून तांदुळाचे कट्टे ट्रकमध्ये भारताना दिसून आले.

ट्रक क्रमांक एम. एच.- ३८ एक्स २९४१ यावेळी पोलिस निरीक्षक महेश कुचेकर यांना बोलावून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ट्रक पोलीस स्टेशनला जमा करून गोडाऊनला कुलूप लावून सील केल्याची माहिती देण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार शहरातील जनता बँक शाखेच्या बाजूला गल्लीत तांदुळाचा ट्रक भरत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता गोडाऊन मधून तांदुळाचे कट्टे ट्रकमध्ये भरत असल्याचे दिसून आले. त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक महेश कुचेकर यांना पाचारण करून कारवाई करण्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करून गोडाऊन कुलूपबंद करून कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे,पोलीस निरीक्षक महेश कुचेकर, बिट जामदार प्रल्हाद चव्हाण, दिलीप चव्हाण, जमील, नरेंद्र खाडे, जगनाथ घाटे आदींनी कारवाई केली.

ट्रकासह तांदूळ कोणाचा ?

राशन दुकानातुन आला की शेतकऱ्यांचा हा तांदुळची शहानिशा करण्याकरिता पोलिस निरीक्षक यांच्या वतीने मानोरा तहसीलदार यांना पत्र व्यवहार करण्यात आला याबाबत चौकशी नंतरसमजेल तांदूळ कोणाचा याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Akola Illegal Rice Truck Transportation Seized By Police Seals To Godown

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..