थकीत पाणीपुरवठा वीज बिलाचा मुद्दा पोहचला मंत्र्यांपर्यंत

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला अधिकाऱ्यांसोबत संवाद
थकीत पाणीपुरवठा वीज बिलाचा मुद्दा पोहचला मंत्र्यांपर्यंत

अकोला : जिल्ह्यातील ६४ खेडी आणि ८४ काेटी या प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेची विद्युत जाेडणी खंडीत करण्याचा इशारा महावितरणने दिल्यानंतर शनिवारी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला व योग्य उपाययाजेना करण्याची सूचना केल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले.



जिल्ह्यात ८४ आणि ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येताे. मात्र पाणीपट्टी माेठ्याप्रमाणात थकली आहे. परिणामी अनेकदा पाणी पुरवठा खंडीत हाेताे. दरम्यान आता थकीत वीज बिलांच्या मुद्द्यावर महावितरणने सुद्धा विद्युत कनेक्शन बंद करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. दाेन दिवसांपूर्वी पालकमंत्री बच्चू कडू यांनीही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत पाणी पुरवठा विस्कळीत हाेणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली. तसेच शनिवारी शिवसेना नेत्यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.

थकीत पाणीपुरवठा वीज बिलाचा मुद्दा पोहचला मंत्र्यांपर्यंत
बापरे! अकोल्या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; तीव्रता कमी असल्यानं जीवितहानी नाही


पावणे दोन कोटींचे बिल थकीत
६४ खेडी आणि ८४ खेडी या दाेन्ही प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेचे सुमारे पावणे दाेन काेटींचे वीजबिल थकले आहे. खांबोरा ६४ खेडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ काेटी २० लाख ७५ हाजर ९१० रुपये थकले. त्यापैकी ४५ लाखाचा भरणा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने महािवतरणकडे केला आहे. तसेच ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेअंतर्गत ६५ लाख १५ हजार ७२० रुपये थकले आहेत.

थकीत पाणीपुरवठा वीज बिलाचा मुद्दा पोहचला मंत्र्यांपर्यंत
यंदा असा असेल पावसाळा, करा पिकांचे नियोजन

वसुली नगण्य
प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेअंतर्गत पाणीपट्टीची वसुली अल्प असल्याने वसुलीसाठी काही दिवसांपूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पुढाकार घेतला. संबंधित पंचायत समितीच्या पथकासाेबत अभियंता व अन्य कर्मचारीही केले. त्यामुळे वसुलीची रक्कम ८६ लाखांपर्यंत पाेहाेचली. मात्र तरीही यातून संपूर्ण वीजबिल अदा करणे शक्य नसल्याने पाणीपुरवठा खंडित होण्याचा मुद्दा नेहमीच चर्चेला येत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com