esakal | अरे बापरे! कोविड उपचार केंद्रातून पळून गेला अन् उचलले हे मोठे पाऊल..
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Karanja News Suicide of a person passing Covid treatment center

कारंजा शहरातील कानडीपुरा परिसरातील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर वाशीम येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसापूर्वी या ठिकाणावरून सदर रुग्ण निघून गेला होता.

अरे बापरे! कोविड उपचार केंद्रातून पळून गेला अन् उचलले हे मोठे पाऊल..

sakal_logo
By
दीपक पवार

कारंजा -लाड (जि.वाशीम)  ः कारंजा शहरातील कानडीपुरा परिसरातील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर वाशीम येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसापूर्वी या ठिकाणावरून सदर रुग्ण निघून गेला होता.

सर्व यंत्रणा त्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह कारंजा शहरालगत असलेल्या मोक्षधाम परिसरातील जांब रोडवरील तुडुंब भरलेल्या विहिरीत आढळून आला असल्याची बातमी येऊन धडकल्याने शहरात चिंतेचे सावट पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा शहरातील कानडीपुरा परिसरातील वाशीम कोविड सेंटर येथून निघून गेलेल्या इसमाचे ३० जुलै रोजी विहिरीच्या काठावर चप्पल व चष्मा आढळून आला होता.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यावरून पोलिस व तहसील प्रशासनाने त्या इसमाच्या कुटुंबियांना शाहनिशा करण्यासाठी बोलाविले असताना त्यांनी चष्मा व चप्पल त्या इसमाचे असल्याचे सांगितले.

त्यावरून त्या इसमाने आत्महत्या केल्याचा संशय बळावला होता. त्यावरून महसूल, पोलिस, न.प. व सामाजिक संस्थेने जांब शेतशिवारातील काठोकाठ पाणी भरलेल्या विहिरीचे पाणी तोडण्याचे काम ३० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास चालू होते.

सायंकाळ झाल्याने शोध मोहिमेला बाधा निर्माण होऊन पुन्हा ३१ जुलै रोजी पहाटेपासूनच शोध मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता.

अखेर त्या इसमाचा मृतदेह विहिरीमध्ये पालथा पडलेल्या अवस्थेत आढळून आला. सदरहू इसमाची ओळख पटली आहे. शिवाय या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, कोरोनाच्या सावटखाली एकाचा बळी गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)