सॅनिटायझर वापरताना! मग आरतीपासून रहा दोन हात दूर, नाहीतर जीव येईल धोक्यात, हे आहे कारण

विवेक मेतकर
Friday, 21 August 2020

बुध्द‌िची देवता विघ्नहर्त्या गणरायाचे शनिवारी भक्तीमय वातावरणात आगमन होत आहे. पारंपरिक पध्दतीने घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. मात्र, कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सद्या घरोघरी सॅनिटायजर वापरण्यात येत आहे.

 

अकोला : बुध्द‌िची देवता विघ्नहर्त्या गणरायाचे शनिवारी भक्तीमय वातावरणात आगमन होत आहे. पारंपरिक पध्दतीने घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. मात्र, कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सद्या घरोघरी सॅनिटायजर वापरण्यात येत आहे.

लाडक्या गणपती बाप्पाची आरती करताना हाताला सॅनिटायजर नसल्याची आधी खात्री करून घ्या. मगच आरती करा. कारण अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर आगीच्या संपर्कात आल्याने हात भाजल्या जाण्याची दाट शक्यता असते.

अशी करावी गणेशाची प्राणप्रतिष्ठा | eSakal

सद्या देशात तसेच राज्यात कोरोना संसर्गाचे संकट ओढावले असून या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता प्रत्येकाने आपल्या कुटूंबात, घरी गणेशाची स्थापना करुन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या ...

मात्र असे असले तरी घरोघरी सॅनिटायजर सहज उपलब्ध असल्याने किमान लाडक्या गणपती बाप्पाची आरती करताना हाताला सॅनिटायजर नसल्याची खात्री करून घेणे आवश्‍यक झाले आहे.

गणेशाची व्रते | eSakal

लहान मुलांची घ्या अधिक काळजी
गणपती उत्सवादरम्यान अल्कोहोल युक्त सॅनिटायझर लावून आरती किंवा नमस्कार करण्याचा प्रयत्न करणे धोक्याचे ठरू शकते. अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे.त्यामुळे आरती पेटविताना हात भाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच घराल लहान मुलांची जास्त काळजी घेणे आवश्‍यक आहे.

शाडू मातीची इको-फ्रेंडली गणेश ...

आगमणाच्या तयारीत गणेशभक्त
बुध्द‌िची देवता विघ्नहर्त्या गणरायाचे शनिवारी भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. पारंपरिक पध्दतीने घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. शहरातील जठारपेठ, कौलखेड, डाबकी रोड, जुने शहर, सिंधी कॅम्प, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, मलकापूर, मोठी उमरी यासह शहरातील मध्यवर्ती ठिकाणांवर श्री गणेशाची स्थापना होत असून शहरातील गणेशभक्तांना बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता लागलेली आहे.

Ganapati Shadu ... Then take Makhar Environmentally, appeal to ...

यंदा शाडू मातीच्या मूर्तींची अधिक ‘क्रेझ’
गणेशोत्सवाचे मांगल्य जपले जावे आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यास गणेश भक्तांकडून यंदा प्राधान्य देण्यात येत आहे. विशेषत: घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांकडून शाडू मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरला जात असल्याचे पहावयास मिळाले. शाडू मातीच्या बहुतांश मूर्तींची विक्री झाल्याचा दावा विक्रेते तसेच पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्यांकडून करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Keep News Sanitizers hands away from Ganpati Aarti